Rema at Anant Radhika wedding
Rema at Anant Radhika weddingEsakal

Anant Radhika Wedding : 'बेबी काम डाउन' सिंगर रेमा मुंबईत दाखल, अनंत - राधिकाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी घेतले इतके कोटी

Singer Rema is going to perform in Anant-Radhika grand wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या ग्रँड विवाहसोहळ्याला गायक रेमा हजेरी लावणार असून या सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी तिने कोट्यवधी फी आकारली आहे.
Published on

Anant & Radhika : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहेत. अगदी प्री वेडिंग पासून चर्चेत असलेल्या या लग्नात अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी आणि त्यांचे परफॉर्मन्स लक्ष वेधून घेत आहेत. १२ जुलै रोजी होत असलेल्या विवाह सोहळ्यासाठी देखील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळतेय. अंबानींच्या लग्नसोहळ्याचा हा थाट काही निराळाच आहे. प्रत्येक कार्यक्रम तितक्याच थाटात आणि जल्लोषात पार पडताना दिसत आहेत. यातच जगप्रसिद्ध किम कार्दशियन देखील आपल्या बहिणीसोबत खास या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली आहे.

नुकतंच लोकप्रिय सिंगर रेमा देखील मुंबईत दाखल झालाय. रेमा देखील अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी खास भारतात आलाय. बेबी काम डाउन या त्याच्या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हाच रेमा आता अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म देखील करणार आहे. अनंत आणि राधिकाच्या विवाहसोहळ्यात रेमा खास परफॉर्मन्स देणार असल्याचं बोललं जातय. या परफॉर्मन्ससाठी रेमाने तब्बल २५ कोटी घेतले असल्याचं बोललं जातय. या लग्नसमारंभात रेमा त्याचं लोकप्रिय गाणं 'बेबी काम डाउन' गाणार आहे. रेमा हा नाइजेरियन रॅपर, सिंगर आहे.

याशिवाय नुकतीच जॉन सीनाची देखील मुंबईत हजेरी पाहायला मिळाली. WWE स्टार जॉन सीनाने देखील या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबई गाठलय. तेव्हा अनेक आंतरराष्ट्रिय कलाकारांची हजेरी आणि त्यांच्या परफॉर्मन्सी सजलेला असा हा विवाहसोहळा असणार आहे.

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात रिहानाने देखील हजेरी लावली होती. रिहानाने अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तब्बल ७४ कोटी रुपये घेतले होते. तर अनंत - राधिकाच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन बीबरची हजेरी पाहायला मिळाली होती. जस्टिन बीबरने देखील संगीत कार्यक्रमात परफॉर्म केलं होतं.

Rema at Anant Radhika wedding
Anant Radhika Wedding: लेक निघाली सासरला! अनंतला हार घालताच भरून आले राधिकाच्या वडिलांचे डोळे; मुलीवरची माया रडूही देईना

तेव्हा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी,सेलिब्रिटी आणि आंतरराष्ट्रीय स्टार्स यांच्या उपस्थितीत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा थाटात मुंबईत पार पडतोय. या लग्नसोहळ्यात आणखी कोण हजेरी लावणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलय.

Rema at Anant Radhika wedding
Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाचं लग्न कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर; बीकेसीतील कंपन्यांना १५ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम, 'हे' आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.