तुम्ही एका बारमध्ये बारटेंडर आहात अशी कल्पना करा. एके दिवशी, त्या बारमध्ये एक नवीन व्यक्ती येते. ती तुमच्यासमोर येऊन बसते नि तुम्हा दोघांमध्ये संभाषण होते. पुष्कळ गप्पा झाल्यानंतर तुम्ही वेगळे होता. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती पुन्हा तुमच्यासमोर हजर होते. हेच तिसऱ्या, चौथ्या नि पाचव्या दिवशी घडते. कट टू : काहीएक महिन्यांनंतरही ती व्यक्ती तुमचा पाठलाग करत राहते, सतत तुमचा पिच्छा पुरवत राहते. रिचर्ड गॅडने निर्माण केलेल्या ‘बेबी रेनडिअर’ या मालिकेत लेखक, अभिनेता गॅड अशाच एका बारटेंडरच्या भूमिकेत दिसतो. कारण, कोणे एके काळी तो अशाच एका खऱ्याखुऱ्या गोष्टीतला बारटेंडर होता!