Anushka Shetty : बाहुबली फेम अनुष्का शेट्टी करतेय 'या' आजाराचा सामना ; जाणून घेऊया 'या' दुर्मिळ आजाराबद्दल

Anushka Shetty Suffering From Rare Disease : बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी एका दुर्मिळ आजाराचा सामना करतेय.
Anushka Shetty
Anushka Shetty Esakal

बाहुबली सिनेमामुळे जगभरात प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीने नुकतंच ती दुर्मिळ आजाराचा सामना करत असल्याचं उघड केलं. या आजराला सामान्यतः 'लाफिंग डिसीज' या नावाने ओळखलं जातं. पण मेडिकलच्या भाषेत याच नाव स्यूडोबुलबार अफेक्ट (pseudobulbar affect) म्हणजेच PBA या नावानेही ओळखलं जातं. या रोगाची वैशिष्ट्य अशी कि, या रोगाने ग्रस्त रुग्णाला अनियंत्रित हसण्याचा किंवा रडण्याचा सामना करावा लागतो.

हसण्याचा आजार

इंडियाग्लिट्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितलं कि,"मला हसण्याचा आजार आहे. आता तुम्हाला वाटेल हसणे हा प्रॉब्लेम कसा असू शकतो? पण माझ्यासाठी हा आहे. जर हसायला सुरुवात केली तर मी १५-२० मिनिटं सलग हसते. त्यामुळे कॉमेडी सीन्स बघताना किंवा शूटिंग करताना मी हसत हसत अक्षरशः जमिनीवर लोळते आणि त्यामुळे बऱ्याचदा शूटिंग थांबलं आहे. "

पण अनुष्काला असलेला हा आजार नेमका काय आहे जाणून घेऊया.

Anushka Shetty
Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

स्यूडोबुलबार अफेक्ट (pseudobulbar affect) किंवा PBA म्हणजे काय ?

फर्स्टपोस्ट या वेबसाईटच्या हवाल्याने हिरानंदानी हॉस्पिटलमधील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सचिन अडुकिया यांनी सांगितलं कि, हास्यरोग किंवा ज्याला वैद्यकीय भाषेत स्यूडोबुलबार इफेक्ट (पीबीए) म्हणतात, हा स्यूडोबुलबार पाल्सी नावाच्या मोठ्या न्यूरोलॉजिकल सिंड्रोमचा भाग आहे.

"स्यूडोबुलबार इफेक्ट ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामुळे त्याच्या/तिच्या वास्तविक भावनिक स्थितीशी संबंधित नसलेल्या क्षणी अनियंत्रित हसणे किंवा रडणे यांचा उद्रेक होतो. हे अचानक होणारे उद्रेक सामाजिकदृष्ट्या अयोग्य परिस्थितीत उद्भवू शकतात आणि यामुळे पेच, नैराश्य आणि चिंता निर्माण होऊ शकते ज्यामुळे ज्यांना याचा त्रास होतो त्यांच्यासाठी विविध सामाजिक आव्हाने निर्माण होतात,” डॉ अडुकिया म्हणाले.

हा रोग भावनिक प्रतिसाद ट्रिगर करण्याव्यतिरिक्त, न्यूरोलॉजिकल लक्षणांचा संग्रह देखील ट्रिगर करते. बोलण्यात दोष (डिसार्थरिया) आणि अन्न गिळण्यात अडचण, आणि द्रवपदार्थ (डिसफॅगिया) यांचाही यात समावेश आहे, डॉ अडुकिया पुढे म्हणाले.

'या' आजाराची कारणे

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे अनेक तंतू, चेहरा, जीभ आणि घशाचे स्नायू, मेंदूच्या वरच्या भागातून उद्भवतात, ज्याला कॉर्टेक्स म्हणतात आणि विविध मार्गांद्वारे (ज्याला वैद्यकीयदृष्ट्या कॉर्टिकोबुलबार मार्ग म्हणतात) या तंतूंद्वारे पाठवलेले सिग्नल मेंदूच्या सर्वात खालच्या भागात प्रवास करतात. जेव्हा हे मार्ग बिघडलेले किंवा प्रतिबंधित केले जातात, तेव्हा ते अनियंत्रित किंवा अतिशयोक्तीपूर्ण भावनांना कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भावना आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीमध्ये विसंगती निर्माण होते असं डॉ. अडुकिया यांनी सांगितलं.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या रिसर्चनुसार , स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन रोग, मेंदूतील ट्यूमर, एपिलेप्सी, अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस), मेंदूला झालेली दुखापत आणि अल्झायमर रोग यासारख्या आजारांमुळे स्यूडोबुलबार इफेक्ट होऊ शकतो.

Anushka Shetty
Sonakshi Sinha: खाईन तर फक्त आईच्याच हातचं;सोनाक्षीची फेवरेट आहे सिंधी कढी

कोणाला हा आजार होऊ शकतो ?

डॉ अडुकिया यांच्या म्हणण्यानुसार, स्थिती सामान्यतः वृद्ध लोकसंख्येवर परिणाम करते आणि तरुण लोकसंख्येमध्ये "अत्यंत असामान्य" आहे. बॅरो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या मते, असा अंदाज आहे की यूएस मधील दोन दशलक्ष ते सात दशलक्ष लोकांमध्ये स्यूडोबुलबार इफेक्टशी सुसंगत लक्षणे आढळली आहेत.

यावरील उपचार

थेरपीजच्या मदतीने ही स्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते पण हा आजार समूळ नष्ट करता येत नाही. दीर्घ श्वास घेऊन स्वतःवर नियंत्रण मिळवणे, दुसऱ्या विषयाकडे मन वळवणे, खांदा, मान, छातीशी संबंधित स्नायूंना आराम देणे हे या स्थितीत फायदेशीर ठरते.

या आजाराच्या उपचारांमध्ये रुग्ण आणि कुटूंबाचे समुपदेशन सुद्धा डॉक्टरांकडून केलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com