Bai Ga: गेल्या 5 जन्मांच्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का? 'बाई गं' चा भन्नाट टीझर रिलीज

'बाई गं' या चित्रपटाच्या टीझरमध्ये भन्नाट डायलॉग्स अन् कॉमेडी सीन्स बघायला मिळत आहेत.
 गेल्या 5 जन्मांच्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का? 'बाई गं' चा भन्नाट  टीझर रिलीज
Bai Gasakal

Bai Ga: नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क 5 जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे येत्या 12 जुलै रोजी आपल्याला 'बाई गं' (Bai Ga) ह्या चित्रपटाद्वारे समजेल. या चित्रपटाचं धमाल टिझर आज रिलीझ झालंय.

'बाई गं' चित्रपटाची स्टार कास्ट

'बाई गं' या टिझरमध्ये स्वप्नील जोशला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. 'बाई गं' या चित्रपटाच्या टीझरमध्ये भन्नाट डायलॉग्स अन् कॉमेडी सीन्स बघायला मिळत आहेत.

पाहा टीझर:

"बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com