English Movie: ‘बार्बेरिअन’; नातेसंबंध आणि शोषणाच्या इतिहासाची भयकथा

Barbarian (2022) is a horror film directed by Zach Krieger: आकृतिबंधाचा विचार करता दिग्दर्शक क्रेगरच्या चित्रपटात बरेचसे लघुपट दडलेले आहेत.
Barbarian 2022 horror movie
Barbarian 2022 horror moviesakal
Updated on

Directed by Zach Krieger: ‘बार्बेरिअन’ (२०२२) हा एक भयपट आहे. काही भयपट जंगल किंवा तत्सम निर्जन ठिकाणी घडणारे असतात, तर काही भयपट घरासारख्या जागेलाच भयनिर्मितीसाठी वापरतात. ‘बार्बेरिअन’ दुसऱ्या प्रकारात मोडतो. अमेरिका व युरोपातील देशांत एअर बीएनबी हा प्रकार लोकप्रिय आहे. घरमालक एखाद्या स्वतंत्र कंपनीशी करार करतो आणि ती कंपनी वेगवेगळ्या  ग्राहकांना ते घर तात्पुरते, मर्यादित दिवसांसाठी भाड्याने देते. गुंतवणूक म्हणून विकत घेतलेल्या घरांना हॉटेलच्या धर्तीवर चालवण्याचा हा प्रकार.

‘बार्बेरिअन’मध्ये दोन कंपन्यांच्या बुकिंगच्या घोळामुळे डिट्रॉइट शहरातील एक घर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लोकांना भाड्याने दिले जाते, इथपासून चित्रपटाची सुरुवात होते. मग अनपेक्षित ठिकाणी अनोळखी व्यक्तींनी एकत्र येणं, त्यातली एक पुरुष आणि दुसरी स्त्री असणं, त्या दोघांमधील संवाद यांतून चित्रपट पुढे जाऊ लागतो, पण चित्रपटातील काळ आणि आशय या दोघांपुरताच मर्यादित नाही, तर त्यात त्या घराला लागून येणारा गडद इतिहासही येतो.

Barbarian 2022 horror movie
Alyad Palyad Movie : पुन्हा येतोय 'अल्याड पल्याड' ; सिनेमाच्या निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा

आकृतिबंधाचा विचार करता दिग्दर्शक क्रेगरच्या चित्रपटात बरेचसे लघुपट दडलेले आहेत. तसे पाहता हा आहे एक एकसंध चित्रपटच, पण कथेची रचना, मांडणी व दृश्य परिणाम पाहता चित्रपटाचे सरळसरळ काही तुकडे पडतात. रोमँटिक वातावरण, तग धरून जिवंत राहण्यातील थरार, रहस्यपट व भयकथा अशा अनेक प्रकारच्या जागा चित्रपटात आहेत. याखेरीज सबंध चित्रपट ही एक रूपककथा आहे. हे रूपक आहे विश्वास आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांविषयीचे.

लैंगिक अत्याचार व क्रूरता, ‘मी टू’ चळवळ यासारख्या बाबींचे संदर्भ चित्रपटात आहेत. आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कुणावर विश्वास ठेवतो, त्याचे काय चांगले-वाईट परिणाम घडतात, त्यातून आपण काही शिकतो का, असे अनेक मुद्दे त्यात येतात, मात्र सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असताना चित्रपटीय कथनाची कौशल्ये बाजूला सारलेली नाहीत. त्यामुळेच हे सारे सुप्त संदर्भ घेऊन अंतिमतः सगळा चित्रपट गोळीबंद भय-रूपककथेप्रमाणे उलगडतो.

Barbarian 2022 horror movie
OTT New Released : नव्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? फुल्ल टू मनोरंजनाची गॅरंटी!

‘बार्बेरिअन’चे वर्णन करायचे झाल्यास दिग्दर्शक जॉर्डन पीलच्या कामाच्या धर्तीवरील चित्रपट, असे वर्णन करता येणे सहज शक्य आहे. दिग्दर्शक पील ज्याप्रमाणे वांशिक भेदभावाचा इतिहास भयपटांतून मांडतो, तसेच इथेही घडते. इथे वांशिक भेदभावाऐवजी स्त्री-पुरुष नातेसंबंध, स्त्रियांवरील अत्याचार आणि शोषणाचा इतिहास, पुरुषांची वर्चस्ववादी मानसिकता, मातृत्व अशा काही संकल्पना येतात.

या साऱ्या संकल्पना, तसेच घरासारख्या सुरक्षित जागेतच घडणारी उलथापालथ यांमुळे ‘बार्बेरिअन’मधील भयाचा एकूण परिणाम अधिक वाढतो. त्याचा वास्तवाशी असणारा संबंध त्याला अधिक भयकारक बनवतो. त्यासाठीच हा आशयघन भयपट आवर्जून पहावासा ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.