Bollywood Entertainment News : या दिवाळीत बॉलिवूडमधील दोन बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनच्या भुलभुलैय्या 3 ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. नुकतंच या सिनेमाचे सहनिर्माते भूषण कुमार यांनी या दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी रिलीज होण्यामागील कारणांबाबत खुलासा केला. दोन्ही सिनेमाच्या टीमने हा क्लॅश होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते पण आधीच दिलेल्या काही वचनबद्धतेमुळे त्यांना हा सिनेमा रिलीज करावा लागला असा खुलासा त्यांनी केला.