Bigg Boss Marathi Season 5 : भांडणाच्या नादात स्पर्धकांनी केले बाळांचेच हाल , भावनाशून्य सदस्यांना बिग बॉस करणार शिक्षा ?

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये घरात आलेल्या बाळांवरून घरातील दोन्ही स्पर्धक भिडले. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5 : भांडणाच्या नादात स्पर्धकांनी केले बाळांचेच हाल , भावनाशून्य सदस्यांना बिग बॉस करणार शिक्षा ?
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन पाच चा खेळ चांगलाच रंगला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी घरात धुमाकूळ घातला. घरात दोन पाहुणे आले होते. ह्या दोन छोट्या बाळांना सांभाळण्याची जबाबदारी बिग बॉसने घरच्यांवर सोपवली होती पण घरातील सदस्यांना तेही करणं समजलं नाहीये.

बिग बॉस ने घरातील सदस्यांना या दोन्ही छोट्या बाळांना सांभाळण्याचं कार्य सोपवलं होतं. प्रत्येक टीम कडे एक बाळ देण्यात आलं होतं आणि बझर वाजला की, त्या बाळाचे लंगोट बदलायचे होते. मधल्या वेळेत समोरच्या टीमविषयी बाळांच्या भाषेत वाईट बोलून त्यांचं मनोरंजन करायचं होतं. पण बझर वाजताच दोन्ही टीम मध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावरून दोन्ही टीम एकमेकांशी भिडल्या. त्यात त्या बाळांचे हाल झाले.

Bigg Boss Marathi Season 5 : भांडणाच्या नादात स्पर्धकांनी केले बाळांचेच हाल , भावनाशून्य सदस्यांना बिग बॉस करणार शिक्षा ?
Bigg Boss Marathi S5 : नॉमिनेशनमधून वाचल्यावर निक्कीची पुन्हा घरात दादागिरी , सदस्यांचे कपडे फेकले आणि कॅप्टनला केली धक्काबुक्की

कलर्स मराठी वर नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की दोन्ही सदस्यांमध्ये चांगलंच भांडण झालं. त्यातून दोन बाहुल्यांची खेचाखेची झाली आणि यातून त्या दोन्ही बाहुल्यांचे दोन तुकडे झाले. घरातील सदस्यांचे हे भावनाशून्य व्यक्त होणं बिग बॉसला काही पटलं नाही आणि बिग बॉस ने घरातील सदस्यांना एकत्र करत जाहीर केलं की, आता बिग बॉस ही भावना शून्य होणार आहेत.

बाळांवरून टीम A ने घातलेला धुमाकूळ आता सगळ्यांनाच महागात पडणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमा वर कधीही.

Bigg Boss Marathi Season 5 : भांडणाच्या नादात स्पर्धकांनी केले बाळांचेच हाल , भावनाशून्य सदस्यांना बिग बॉस करणार शिक्षा ?
Bigg Boss Marathi Season 5 Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री ; घरात येणार आणखी एक कोल्हापूरचा रांगडा गडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com