BIGG BOSS Hindi Entertainment Updates: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉस हिंदीचा आठरावा सीझन सुरु होत आहे. या सीझनमध्ये प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते हे सहभागी होणार आहेत. स्वतः सदावर्ते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
'टीव्ही ९ मराठी'शी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉस हिंदीच्या सहभागाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, आगे आगे देखो होता हैं क्या.. मी कशाचीच काळजी करत नाही आणि कुणालाच घाबरत नाही. माझी लढाई ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आहे, असंही ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते हे गुरुवारीच बिग बॉसच्या घरातील प्रक्रियेसाठी निघाले आहेत. घरातील १८ सदस्यांपैकी ते एक असणार आहेत. सदावर्ते घरामध्ये कसे वावरतात, इतर सदस्यांसोबत ते कसं जुळवून घेतात, हे पाहाणं रंजक ठरणार आहे.
सदावर्ते म्हणाले की, बिग बॉसच्या घरामध्ये कुठलीही लढाई किंवा तंटे होणार नाहीत. कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, हे मी सांगतो. चांगली माणसं ही चांगल्या माणसांना शोधत असतात, त्यामुळे बिग बॉसने मला शोधले आहे. घरातल्या इतर सदस्यांसोबत माझं भावाचं नातं राहणार आहे.
बिग बॉस मराठीचा यावर्षीचा सीझन इतिहासातला सर्वात गाजलेला सीझन ठरला आहे. इन्फ्लूएन्सर, मराठी आणि हिंदी मनोरंज क्षेत्रातील कलाकारांमुळे सीझनला चार चाँद लागले. मात्र हा मराठीचा सीझन केवळ ७० दिवसांमध्ये उरकता घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण काहीही सांगितलं जात असलं तरी हिंदीमुळे मराठीवर अन्याय झाला, अशाच मराठी रसिकांच्या भावना आहेत.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेले दोन सदस्य आहेत. एक म्हणज सुरज चव्हाण आणि दुसरी हिंदी अभिनेत्री निक्की तांबोळी. यांच्यामुळे सीझन गाजला. इतर सदस्यांनीही प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल मनोरंजन केलं. ६ तारखेला रविवारी या सीझनचा विजेता घोषित होणार आहे.
दरम्यान, हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होत असलेले गुणरत्न सदावर्ते यांचा स्वभाव आक्रमक आहे. त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाया लढल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर ते परिचयाचे आहेत. बिग बॉसच्या घरात ते कशा पद्धतीने स्वतःला टिकवून ठेवतात, हे पाहाणं रसिकांसाठी पर्वणीच असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.