Sonu Srinivas Gowda: ‘बिग बॉस’ फेम सोशल मीडिया स्टारला अटक; नेमकं प्रकरण काय?

Sonu Srinivas Gowda: सोनू श्रीनिवास गौडावर मुलीला दत्तक घेताना योग्य प्रक्रिया न केल्याचा आरोप आहे.
Sonu Srinivas Gowda
Sonu Srinivas Gowdaesakal
Updated on

Sonu Srinivas Gowda: सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस ओटीटी कन्नड (Bigg Boss Kannada) फेम सोनू श्रीनिवास गौडाला (Sonu Srinivas Gowda) पोलिसांनी शुक्रवारी(22 मार्च) अटक केली आहे. सोनू श्रीनिवास गौडावर मूल दत्तक घेताना योग्य प्रक्रिया न केल्याचा आरोप आहे. बालकल्याण समितीच्या (Child Welfare Committee)  तक्रारीच्या आधारे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण...

सोनू श्रीनिवास गौडाने काही दिवसांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतली. याबद्दल तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत माहिती शेअर केली होती. आता मुलगी दत्तक घेतल्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी सोनूला अटक केली आहे.बालकल्याण समितीनं सोनूवर गंभीर आरोप केले आहेत.

सहानुभूती मिळविण्यासाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी मुलीला दत्तक घेतल्याचा आरोप

रिपोर्टनुसार, सोनू श्रीनिवास गौडाविरोधात केलेल्या तक्रात तिच्या आरोप करण्यात आला आहे की, सहानुभूती मिळविण्यासाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी तिनं मुलीला दत्तक घेतले, जेणेकरून तिला सेलिब्रिटीचा दर्जा मिळेल. या प्रकरणी बायदरहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सोनूला पोलिसांनी अटक करण्यात आली.

सोनूनं आरोप फेटाळले

सोनू श्रीनिवास गौडाने या संपूर्ण प्रकरणात ती निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. मुलीला दत्तक घेण्यासाठी प्रत्येक प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा सोनूनं केला आहे. सोनू श्रीनिवास गौडानं सांगितलं, मुलीला घरी आणून केवळ 15 दिवस झाले आहेत. सध्या बालकल्याण समितीचे अधिकारी माझी चौकशी करत आहेत.

Sonu Srinivas Gowda
Manoj Bajpayee : "निवेदन नही नरसंहार.!" मनोज वाजपेयी यांच्या ‘भय्या जी’ चा धमाकेदार टीझर

सोनूनं शेअर केला व्हिडीओ

सोनू श्रीनिवास गौडाने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुलगी दत्तक घेतल्याचा खुलासा केला होता. मात्र, सोनू श्रीनिवास गौडाकडे मूल दत्तक घेतल्याच्या प्रक्रियेशी संबंधित असणारी आवश्यक माहिती नसल्याचे बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Sonu Srinivas Gowda
Sara Ali Khan : "मी कधीही माफी मागणार नाही..." ट्रोल करणाऱ्या चाहत्‍यांना साराचे प्रत्युत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.