BIGG BOSS Marathi Video: बिग बॉसच्या घरात चला हवा येऊ द्या! डॉक्टर निलेश साबळेची एन्ट्री, पत्रकाराचा थेट निक्कीला अडचणीचा प्रश्न

Nikki Tamboli: शनिवारच्या प्रोमोमध्ये पत्रकार घरातील सदस्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका पत्रकाराने निक्कीला प्रश्न विचारला- तुला असं वाटतंय का अरबाज घरातून जाईल आणि त्यामुळे आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे? त्यावर निक्की चिडलेली दिसली आहे.
BIGG BOSS Marathi Video: बिग बॉसच्या घरात चला हवा येऊ द्या! डॉक्टर निलेश साबळेची एन्ट्री, पत्रकाराचा थेट निक्कीला अडचणीचा प्रश्न
Updated on

Bhaucha Dhakka: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन मराठी रसिकांनी डोक्यावर घेतला आहे. आज शनिवारी भाऊचा धक्का असल्याने सर्वांच्या नजरा या शोकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे भाऊच्या धक्क्यावर पत्रकार परिषददेखील होणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर एन्ट्री होणार आहे ती 'चला हवा येऊ द्या फेम' या विनोदी मालिकेचा होस्ट डॉक्टर निलेश साबळेची. निलेश साबळे घरामध्ये येऊन घरातल्या लोकांची शाळा घेणार आहे. त्याने घरातील सदस्यांना चपखल आणि नेमके प्रश्न विचारले आहेत. जान्हवीकडे बंदूक दिली तर तिचा निशाणा कुणावर असेल? असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आलेला आहे.

महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये मीडिया जाणार आहे. शनिवारच्या प्रोमोमध्ये पत्रकार घरातील सदस्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका पत्रकाराने निक्कीला प्रश्न विचारला- तुला असं वाटतंय का अरबाज घरातून जाईल आणि त्यामुळे आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे? त्यावर निक्की चिडलेली दिसली आहे.

या प्रश्नावर निक्की काय बोलते, हे भाऊच्या धक्क्यावर दिसणार आहे. असंही नॉमिनेशननंतर निक्कीने अभिजीत आणि संग्रामसोबत सलोखा दाखवायला सुरुवात केली आहे. ती तिच्या मनाप्रमाणे गेम खेळत असल्याचं दिसून आलेलं आहे. या आठवड्यात घराबाहेर कोण पडणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

वोटिंग लाईन्सचा अंदाज घेतला असता अरबाज हा सर्वात शेवटी असून पुन्हा सुरजच प्रेक्षकांच्या पसंतीचा टॉपचा सदस्य ठरला आहे. त्यामुळे घरातून नेमकं बाहेर कोण जाणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे अरबाजला घरात ठेवणं हे बिग बॉसला महत्त्वाचं वाटत असू शकतं. दुसरीकडे संग्रामला दुखापतीमुळे घराबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशीही शक्यता आहे. वर्षा उसगावकर यादेखील रेड झोनमध्येच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.