Bigg Boss Marathi
Bigg Boss MarathiEsakal

Bigg Boss Marathi S5 Voting Trends : कोण झालं सेफ, कोण जाणार घराबाहेर ? जाणून घ्या बिग बॉस मराठीचे वोटिंग ट्रेंड्स

Bigg Boss Marathi Season 5 Latest Voting Trends : आज शनिवारी आणि उद्या रविवारी बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. घरातून या आठवड्यात कोण एलिमिनेट होणार हे जाणून घेऊया.
Published on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चा सीजन चांगलाच गाजतोय. घरात या आठवड्यात सदस्यांनी बराच गोंधळ घातला. भांडण, धमाल , प्रेमप्रकरण या आठवड्यात चर्चेत राहिली. या आठवड्यात घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. वोटिंग लाईन बंद होण्यापूर्वी लेटेस्ट वोटिंग ट्रेंड जाणून घेऊया.

बिग बॉस मराठी सीजन ५ च्या दुसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळी, घनश्याम दरवडे, निखिल दामले हे स्पर्धक नॉमिनेट आहेत. त्यामुळे कोण कलाकार या आठवड्यात वोटिंग ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे आणि कोण आहेत पिछाडीवर याची उत्सुकता सगळ्यांवर आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Season 5 : "माझ्या तोंडाला लागायचं नाही" छोटा पुढारी आणि धनंजय पोवारमध्ये झाली बाचाबाची, नेटकरी म्हणाले...

'बिग बॉस मराठी सीजन इरा' या इंस्टाग्राम पेजने नुकतेच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड शेअर केले. या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाणने वोट्समध्ये आघाडी कायम ठेवली आहे. सुरजच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्याचा घरातील वावर सगळ्यांनाच आवडतोय. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे अभिनेत्री योगिता चव्हाण. पहिल्या आठवड्यात घरात शांत असणाऱ्या योगिताचा टास्कमधील परफॉर्मन्स सगळ्यांना आवडलाय त्यामुळे ती दुसऱ्या नंबरवर आहे. तिसऱ्या नंबरला निक्की तांबोळी आहे. निक्कीनेही या आठवड्यात फार भांडण न करता शांत राहून चांगला गेम खेळलं आहे. चौथ्या नंबरवर पंढरीनाथ कांबळी आहेत. तर पाचव्या नंबरवर घनश्याम म्हणजेच छोटा पुढारी असून सगळ्यात शेवटच्या नंबरवर निखिल दामले आहे. त्यामुळे या आठवड्यात निखिल घरातून बाहेर जाणार असल्याचं म्हंटलं जातंय.

निखिल दामले पहिल्या दोन आठवड्यात दोन्ही ग्रुपमध्ये वावरताना दिसतोय. काहीजण त्याला स्पाय ही म्हणत आहेत. त्यामुळे निखिल बाहेर जाणार कि घनश्याम याचं उत्तर रविवारच्या भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर कधीही.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi 5: वर्षा यांच्याबद्दल जान्हवीच्या 'त्या' वक्तव्यावर उठली टीकेची झोड; अमृता धोंगडेचाही पारा चढला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.