BIGG BOSS Marathi: आपला गावठी पॅटर्नय! भल्याभल्या धटिंगांना एकटा सूरज भिडला; रौद्ररुप बघून वर्षाताई खुश

Suraj Chavan: ''तो मला म्हणला तुला कवळीत उचलून पाण्यात फेकून देईल.. मी म्हणलं तू तसा पाण्याच फेकशील पण मग मी बाहेर परत आल्यावर तुला कळणारसुद्धा नाही मी काय करीन.. मी लैss गावठी पॅटर्नय...''
BIGG BOSS Marathi: आपला गावठी पॅटर्नय! भल्याभल्या धटिंगांना एकटा सूरज भिडला; रौद्ररुप बघून वर्षाताई खुश
Updated on

Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज काहीतरी नवीनच घडतंय. मराठी रसिकांनी हा शो डोक्यावर घेतला आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये हा शो सर्वाधिक बघितला जाणारा शो ठरला आहे. पहिल्या आठवड्यात शांत शांत राहणारा गुलीगत सूरज चव्हाण तिसऱ्या आठवड्यात भल्याभल्यांना नडला आहे.

कलर्स मराठीने 'बिग बॉस मराठी'च्या शुक्रवारच्या शोचे प्रोमो लाँच केले आहेत. एका प्रोमोत सूरजचं रौद्र रुप तर दिसून येतंय, पण त्यानंतर तो वर्षा उसगावकर यांच्याशी जे काही बोलतोय, त्याचाही एका प्रोमो वाहिनीने शेअर केलाय.

आजच्या भागामध्ये एकटा सूरज अरबाज आणि वैभव या दांडग्या गड्यांना भिडणार आहे. त्यानंतर वर्षा उसगावकर यांना बोलताना सूरज म्हणतो, मला तो थांबवत होता.. मला इतकी चीड यायची ना.. मी फक्त मान उचलली तर.. बघा माझी किती पॉवरय, मंग मी सुटलो रे सुटलो...

BIGG BOSS Marathi: आपला गावठी पॅटर्नय! भल्याभल्या धटिंगांना एकटा सूरज भिडला; रौद्ररुप बघून वर्षाताई खुश
Sambhajinagar News: रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान, 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे छ. संभाजीनगरमध्ये तणाव, सध्या परिस्थिती काय?

सूरज पुढे म्हणतो, तो मला म्हणला तुला कवळीत उचलून पाण्यात फेकून देईल.. मी म्हणलं तू तसा पाण्याच फेकशील पण मग मी बाहेर परत आल्यावर तुला कळणारसुद्धा नाही मी काय करीन.. मी लैss गावठी पॅटर्नय...

सूरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. मराठी रसिकांना शुक्रवारच्या भागाची प्रतीक्षा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जे काही सुरु आहे, त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. टीम एची मग्रुरी रसिकांना भावलेली नाही. त्यामुळे नको असलेले लोक वोटिंगनुसार घराबाहेर काढा, अशी मागणी अनेक इन्फ्लूएन्सर करत आहेत.

बिगबॉसच्या घरामध्ये कॅप्टन निवडीसाठी शुक्रवारी दुसरा टास्क होणार आहे. हा टास्क इंटरेस्टिंग ठरणार असून टीम ए मधून कोण कॅफ्टन होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. विकेंडला रितेश देशमुखांच्या भाऊच्या धक्क्यावर चांगल्या चांगल्यांची मस्ती उतरवली जाते. यावेळच्या भागात हिटलिस्टवर कोण असेल, याचा अंदाज रसिकांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.