Bigg Boss OTT 3: "तू फक्त सेट बघायला आलायस का?"; पहिल्याच दिवशी बिग बॉसनं 'या' स्पर्धकाला झापझाप झापलं, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss: बिग बॉसनं लव कटारियाला झापलं आहे. लव कटारिया आणि बिग बॉस यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"तू फक्त सेट बघायला आलायस का?"; पहिल्याच दिवशी बिग बॉसनं 'या' स्पर्धकाला झापझाप झापलं, व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss OTT 3sakal

Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) या कार्यक्रमाचा प्रिमियर काल (21 जून) पार पडला. या शोमध्ये 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. एल्विश यादवचा चांगला मित्र आणि यूट्यूबर लवकेश कटारिया ऊर्फ लवनं देखील शोमध्ये भाग घेतला आहे. अशातच बिग बॉसनं पहिल्याच दिवशी लव कटारियाची शाळा घेतली आहे. बिग बॉसनं लव कटारियाला झापलं आहे. लव कटारिया आणि बिग बॉस यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लव हा कंफेशन रूमध्ये बसलेला आहे. बिग बॉस त्याला शो आणि स्पर्धकांच्या प्रतिसादाबद्दल विचारतात.

व्हिडीओमध्ये दिसते की, बिग बॉसने त्याला विचारले की, तो फक्त सेट पाहायला आलायस? यावर लव म्हणतो, "नाही नाही सर, जर्नी जगण्यासाठी आलो आहे. आपल्या लोकांसाठी आणि कुटुंबासाठी आलो आहे."

"तू फक्त सेट बघायला आलायस का?"; पहिल्याच दिवशी बिग बॉसनं 'या' स्पर्धकाला झापझाप झापलं, व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss OTT 3: "दोन बायका फजिती ऐका!"; कोण आहे दोन पत्नींसह बिग बॉसमध्ये एन्ट्री करणारा अरमान मलिक?

यानंतर बिग बॉसने लवला विचारले, "मला सांग, तुला बिग बॉसमध्ये येऊन कसे वाटत आहे?" लवने उत्तर दिले की, सुरुवातीला थोडी भिती वाटली. पण त्यानंतर विशाल पांडेसोबत चांगले बॉन्डिंग झाली. माझा एखादा मित्र असेल तर मला मजा येते.'

पुढे बिग बॉसनं लवला विचारलं, "तू म्हणाला मित्र असेल तर मला मजा येते, तू एकट्याने कधी काम केले नाहीस का?" यावर लव म्हणतो, 'नाही सर, मी नक्कीच एकट्याने काम केले आहे.'

पाहा व्हिडीओ:

बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमध्ये आता स्पर्धकांना कोण-कोणते टास्क स्पर्धक खेळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com