Bigg Boss OTT 3: सना मकबुल बिग बॉस OTT 3ची विजयी; रनरअप नेझी, विजेत्याला काय-काय मिळालं बक्षीस?
नवी दिल्ली- बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) चा तिसरा सिझन संपला आहे. तिसऱ्या सिझनची विजेती सना मकबुल ठरली आहे. शुक्रवारी रात्री अभिनेता अनिल कपुरने विजेत्याची घोषणा केली. सना मकबुल आणि नेझी यांच्यामध्ये ट्रॉफीसाठी स्पर्धा होती, पण नेझीला रनरअप पदावर समाधान मानावे लागले आहे. बिग बॉस ३ च्या विजेत्याला २५ लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
विजयानंतर सनाने एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आणि आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, 'पहिल्या आठवड्यात सगळं चांगलं वाटलं. पण, जसं जसं शो पुढे सरकत गेला तसं आव्हानं येत गेली. गोष्टी बदलत गेल्या, लोकं बदलत गेले. काही मित्र विरोधात गेले. काहीजण तुमच्या पाठीमागे तुमच्याबाबत वाईट बोलू लागले. पण मी येथे जिंकण्यासाठी आले होते आणि जिंकले'
बिग बॉसमध्ये वेगवेगळे चढउतार आले. असाही एक क्षण आला जेव्हा मी एकटी पडली आहे असं वाटलं. घरामध्ये ग्रुप तयार झाले होते. जे मित्र मला समजून घ्यायचे तेच मला त्रास देऊ लागले. ते आता माझ्यासोबत नव्हते. काही चांगले मित्र घर सोडून देले. पण, मी शेवटपर्यंत धीर सोडला नाही. मी लक्ष केंद्रीत केलं आणि आज मी जिंकले आहे. मला आनंद आहे, असं सना म्हणाली.
सनाने आपल्या चाहत्यांचे आणि मित्रांचे आभार मानले आहेत. अंतिम फेरीमध्ये रॅपर नेझी, अभिनेता रणवीर शौरी, साई केतन राव, कंटेन्ट क्रियेटर क्रितिका मलिक हे ट्रॉफीसाठी प्रयत्न करत होते. पण, विजयाची माळ अखेर सनाच्या गळ्यात पडली. रणवीर शौरीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, अनिल कपूरने होस्ट केलेल्या बिग बॉस ओटीटी-३ ला सलमान खानच्या बिग बॉस ओटीटीपेक्षा जास्त व्ह्युज मिळाल्याचे सांगितले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.