Binny and Family : जुन्या आणि नवीन पिढीला विचार देणारा 'बिन्नी अ‍ॅण्ड फॅमिली' चित्रपट

Binny and Family Movie Review : या चित्रपटाची कथा लंडन आणि बिहारमध्ये घडणारी आहे. ही कथा आहे बिन्नी आणि तिच्या कुटुंबाची. बिन्नी (अंजली धवन) ही आधुनिक विचारसरणीची चुलबुली अशी मुलगी असते.
Binny and Family Movie Review
Binny and Family Movie ReviewSakal
Updated on

कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणारे किंबहुना कौटुंबिक नात्यातील विविध पदर अलगदपणे उलगडणारे, कौटुंबिक नातेसंबंधावर भावनिक फुंकर घालणारे चित्रपट आपल्याकडे कित्येक आलेले आहेत आणि त्या चित्रपटांनी चांगला व्यवसायदेखील केला आहे.

आता प्रदर्शित झालेला बिन्नी अॅण्ड फॅमिली हा चित्रपट याच पठडीत बसणारा आहे आणि या चित्रपटाद्वारे चांगला संदेश देण्यात आला आहे. दोन पिढ्यांमधील वाढत जाणारे अंतर...त्याचा त्या कुटुंबावर होणारा परिणाम...पुराणमतवादी विचार आणि आधुनिक विचारसरणी यामध्ये कुटुंबप्रमुखांची होणारी ससेहोलपट...असा एकूणच कौटुंबिक मनोरंजन करणारा आणि भावनिक ओलावा असणारा हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी दोन पिढ्यांमधील अंतरामुळे होणारे वादविवाद, त्यातून कुटुंबाची होणारी घुसमट आणि एकमेकांना समजून घेतल्यानंतर जीवनात फुलणारा आनंद अशा काही बाबी छान टिपलेल्या आहेत. या चित्रपटाची कथा लंडन आणि बिहारमध्ये घडणारी आहे. ही कथा आहे बिन्नी आणि तिच्या कुटुंबाची.

Binny and Family Movie Review
Navra Maza Navsacha 2 Collection : बॉक्स ऑफिसवर नवरा माझा नवसाचा 2 ची सुस्साट कमाई ! वीकेंडला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

बिन्नी (अंजली धवन) ही आधुनिक विचारसरणीची चुलबुली अशी मुलगी असते. ती लंडनमध्ये आपल्या आई (चारू शंकर) आणि वडील (राजेश कुमार) यांच्या सोबत राहात असते. तिची आजी (हिमानी शिवपुरी) व आजोबा (पंकज कपूर) बिहारमध्ये राहात असतात.

ते पुराणमतवादी विचारांचे असतात. हे आजी व आजोबा काही दिवसांसाठी आपल्या मुलाकडे लंडनमध्ये राहायला येतात. ते दोन महिने राहायला आल्यामुळे घराची संपूर्ण रचना बदलली जाते. घरातील बारचा बुक शेल्फ बनविला जातो.

भिंतींवर टांगलेले पार्टीचे फोटो गायब केले जातात. एकूणच सांगायचे तर आजी व आजोबा आल्यामुळे घरातील वातावरण संपूर्ण बदलते. बिन्नीची पार्टी तसेच मित्रमैत्रिणींबरोबर फिरणे वगैरे गोष्टींवर बंधने येतात. तिचे वडीलदेखील आजी व आजोबांची आज्ञा पाळणारे असतात. त्यांची मर्जी आणि त्यांचे आचारविचार मानणारे असतात.

त्यामुळे यामध्ये बिन्नीची घुसमट होत असते. त्यानंतर दोन महिन्यांनी आजी - आजोबा बिहारला निघून जातात. साहजिकच ते गेल्यामुळे बिन्नी आपले मस्तमौला जीवन जगत असते. मात्र त्यानंतर कहाणीमध्ये एक नवीन टिव्ट येतो आणि मग कहाणी कोणते वळण घेते हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे,

Binny and Family Movie Review
नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅटर्न वेगळा!

दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी ही कौटुंबिक कथा सुंदररीत्या गुंफली आहे. दोन पिढ्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले...एकमेकांना समजून घेतले तर जीवनात आनंदाचा मळा कसा फुलतो असा संदेश त्यांनी यामध्ये दिला आहे. पंकज कपूर, हिमानी शिवपुरी,

अंजिनी धवन,राजेश कुमार,चारू शंकर या कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. पंकज कपूर आणि हिमानी शिवपुरी हे अनुभवी कलाकार आहेत आणि त्यांनी आपले अभिनयकौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बिन्नीच्या भूमिकेत अंजिनीने कमाल केली आहे.

Binny and Family Movie Review
Dharmaveer 2 Movie Review: ''हू इज एकनाथ शिंदे'' सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट !

मनमौजी आणि मस्तीखोर तसेच भावनिक व समंजस असे भूमिकेचे विविध कंगोरे तिने पडद्यावर सुरेख रेखाटले आहेत. अभिनेता वरूण धवनची ती भाची आहे आणि ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार म्हणून साऱ्या इंडस्ट्रीचे लक्ष तिच्याकडे लागलेले होते. तिने त्या अपेक्षा आपल्या भूमिकेतून सिद्ध करून दाखविल्या आहेत.

अभिनेता राजेश कुमारनेदेखील त्याची भूमिका चोख केली आहे. एकीकडे आई व वडील आणि दुसरीकडे पत्नी व मुलगी यांच्या विचारांमध्ये होरपळणारी अशी ती व्यक्तिरेखा आहे आणि त्याने ती छान साकारली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. कथेच्या अनुषंगाने संगीत देण्यात आले आहे. मात्र चित्रपटाची पटकथा अधिक घट्ट बांधली असती तर अधिक उठावदार झाला असता. असो. नवीन आणि जुन्या पिढीला विचार देणारा असा हा चित्रपट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.