Raj Thackeray: "मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत रहा साहेब......"; राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
"प्रिय राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा..."; राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट
Raj ThackeraySAKAL

Raj Thackeray: आज (14 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरेंना शुभेच्छा द्यायला आज मनसेचे कार्यकर्ते शिवतिर्थावर गर्दी करत आहेत. अशातच काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राज ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. तर आता तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) देखील नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

"प्रिय राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा..."; राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, "फोटोत दिसताय त्याप्रमाणे..."

तेजस्विनीची पोस्ट

तेजस्विनीनं राज ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "प्रिय राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !
साहेब तुमच्या राजकारणाविषयी, तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत रहा साहेब...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

तेजस्विनी म्हणाली, "राज ठाकरे महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे"

काही दिवसांपूर्वी ‘लोकमत फिल्मी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तेजस्विनीनं राज ठाकरे यांच्याबाबत सांगितलं होतं. या मुलाखतीत ती म्हणाली होती, "राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे राज ठाकरेंचे दुर्दैव नसून महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कुठल्याही मराठी माणसाला कोणताही प्रोब्लेम असेल तर तो माणूस राज साहेबांकडे जातो. त्यांच्याबद्दल इतका विश्वास का वाटतो? कारण ते मराठी माणसासाठी काम करत आहेत. मला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com