Salman Khan: "ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो, त्याला तुम्ही शिजवून खाल्ले," 'प्रिय सलमान' म्हणत कुणी केली माफी मागण्याची विनंती?

Lawrence Bishnoi Baba Siddique: विशेष म्हणजे लॉरेन्स गँग सलमानलाही धमक्या देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात टोळीतील काही जणांना अटकही करण्यात आली होती.
BJP leader Harnath Singh Yadav speaking about Salman Khan's need to apologize to the Bishnoi community.
BJP leader Harnath Singh Yadav addresses the media regarding Salman Khan's blackbuck case.Esakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर येत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे लॉरेन्स गँग सलमानलाही धमक्या देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात टोळीतील काही जणांना अटकही करण्यात आली होती.

भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी लिहिले, "'प्रिय सलमान खान, ज्या काळ्या हरणाची बिश्नोई समाज देवता म्हणून पूजा करतो, तुम्ही त्याची शिकार केली आणि ते शिजवून खाल्ले. त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, बिष्णोई समाजात दीर्घकाळापासून याबद्दल नाराजी आहे. माणूस चुका करतो. तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशातील असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात. माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या चुकीबद्दल बिष्णोई समाजाची माफी मागावी."

हरनाथ सिंह यादव हे भाजपचे माजी राज्यसभा खासदार आहेत. ते उत्तर प्रदेशातील मैनपुरीचे आहेत. नंतर ते एटा येथे स्थायिक झाले. हरनाथ सिंह यादव हे 1996 ते 2008 पर्यंत उत्तर प्रदेशचे आमदार होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे हरनाथ सिंह यादव हे भाजपचे प्रदेश सरचिटणीसही होते. ते कल्याण सिंह यांच्या जवळचे मानले जायचे.

1998 मध्ये जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान त्याच्या सहकलाकारांसह शिकारीला गेला होता. 27-28 सप्टेंबर 1998 च्या रात्री घोडा फार्म हाऊसमध्ये काळवीटाची शिकार करण्यात आली. याचा ठपका सलमान खानवर पडला. यानंतर 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री जोधपूरच्या कांकणी गावात पहाटे 2 वाजता गोळीबाराचा आवाज आला. गावकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दोन काळवीटांची शिकार झाल्याचे दिसले. तेथून एक जिप्सी पळताना ग्रामस्थांना दिसली.

BJP leader Harnath Singh Yadav speaking about Salman Khan's need to apologize to the Bishnoi community.
Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणी 12 ऑक्टोबर 1998 रोजी सलमान खानला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पाच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 17 ऑक्टोबर 1998 रोजी सलमान खानची जोधपूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. 5 एप्रिल 2018 रोजी, अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 7 एप्रिल 2018 रोजी सलमान खानला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि त्याच दिवशी त्याची सुटका झाली.

BJP leader Harnath Singh Yadav speaking about Salman Khan's need to apologize to the Bishnoi community.
Baba Siddiqui Case Update: कोण आहे मुंबई पोलिसांचा सिंघम? ज्यांनी जीव धोक्यात घालून बाबा सिद्दिकींच्या शूटर्सना पकडलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.