Bollywood Entertainment News : आर्थिक गुन्हेगार अन्वेषण विभाग मुंबई पोलीस सध्या बॉलिवूड निर्माते वासू भगनानी यांनी नेटफ्लिक्स कंपनीविरोधात केलेल्या फसवणुकीच्या तक्ररीबाबत तपास करत आहेत. वासू भगनानी यांनी नेटफ्लिक्स आणि त्याच्या सहकारी कंपन्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने सादर केलेल्या रिपोर्टनुसार भगनानी यांनी कंपनीविरोधात तीन सिनेमांबाबत फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.