BookMyShow Crashed: भारतीय चाहत्यांमध्ये 'Coldplay'ची झिंग, तिकिट विक्रीपूर्वीच बुक माय शो क्रॅश

Coldplay Band BookMyShow: कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या किंमती 2,500 रु. ते 12,500 रु. पर्यंत आहेत, तर प्रीमियम लाउंज सीट 35,000 रुपयांना उपलब्ध आहेत.
Coldplay Crashed Book My Show
Coldplay Crashed Book My Show Esakal
Updated on

Coldplay India tour dates 2025:

मुंबईतील बहुप्रतिक्षित कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकिटांची BookMyShow वर विक्री सुरू होण्याच्या काही मनिटांपूर्वीच, तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मचे ॲप आणि वेबसाइट क्रॅश झाली. हा प्रकार घडल्यानंतर सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत तिकीटांसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्लोबल रॉक बँडच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान या शो ची तिकट विक्री दुपारी 12:15 होऊनही सुरू न झाल्याने चाहते आणखी संतापलेले पाहायला मिळाले.

यावेळी अनेक चाहत्यांना हा सर्व प्रकार सोशल मीडियावर उघड केला. याबरोबर त्यांना तिकीट बुक करताना त्यांना आलेल्या एरर मेसेजचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले.

दरम्यान बुक माय शोवर दुपारी 12:18 वाजता अखेर तिकिट विक्री सुरू झाली. तरीही काही चाहत्यांना ॲपवरुन तिकिट बुक करण्यात अडचणी येत होत्या.

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या किंमती 2,500 रु. ते 12,500 रु. पर्यंत आहेत, तर प्रीमियम लाउंज सीट 35,000 रुपयांना उपलब्ध आहेत.

Coldplay Crashed Book My Show
Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

कोल्डप्लेचा हा कॉन्सर्ट 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. दरम्यान कोल्डप्लेचा भारतात शेवटचा कॉन्सर्ट 9 वर्षांपूर्वी झाला होता. त्यामुळे यंदाच्या कॉन्सर्टवर देशभरातील चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.

काय आहे कोल्डप्ले?

कोल्डप्ले हा ब्रिटीश रॉक बँड आहे जो 1996 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे मुख्य गायक आणि कीबोर्ड वादक ख्रिस मार्टिन आणि लीड गिटार वादक जॉनी बकलँड यांनी स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी बँडचे नाव "पेक्टोराल्झ" असे केले. पुढे त्यांनी हे नावही बदलत "स्टारफिश" असे केले आणि शेवटी 1998 मध्ये "कोल्डप्ले" असे केले.

Coldplay Crashed Book My Show
Raha Kapoor : 'मल्याळी अंगाई गीत आणि अतरंगी खेळ' ; रणबीर असा करतो लेकीचा सांभाळ , आलियाने केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.