Siddharth Jadhav: कान चित्रपट महोत्सवात सिद्धार्थ जाधवच्या चित्रपटाचा जलवा; "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस"चं होणार स्क्रिनिंग

Hazaar Vela Sholay Pahilela Manus Movie: अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या एका चित्रपटाचे देखील स्क्रिनिंग कान चित्रपट महोत्सवात होणार आहे.
सिद्धार्थ जाधव
Hazaar Vela Sholay Pahilela Manus Moviesakal
Updated on

cannes 2024: गेल्या काही दिवसांपासून कान चित्रपट महोत्सवाची (Cannes Film Festival) चर्चा होत आहे. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 16 मे रोजी कान चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात विविध चित्रपटांचे स्क्रिनिंग होत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या एका चित्रपटाचे देखील स्क्रिनिंग कान चित्रपट महोत्सवात होणार आहे. याबाबत सिद्धार्थनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थनं शेअर केली पोस्ट

सिद्धार्थच्या "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाचं स्क्रिनिंग कान चित्रपट महोत्सवात होणार आहे. याबाबत सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "आपला मराठी सिनेमा, CANNES फिल्म फेस्टिव्हल बद्दल खूप वेळा ऐकलं होतं, जेव्हा जेव्हा इथे आपला "मराठी सिनेमा" गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा.. CANNES फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे . super happy वाटतंय.

पुढे सिद्धार्थनं पोस्टमध्ये लिहिलं, "CANNES फिल्म फेस्टिव्हलमध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात. तिथे आपल्या "मराठी सिनेमाचं" स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे. Thank you so much team "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस".खूप छान वाटतंय, असंच प्रेम ठेवा..हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय. लव यू.. थँक्यू !"

सिद्धार्थनं शेअर केलेल्या पोस्टनुसार, "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाचं स्क्रिनिंग 16 मे आणि 19 मे रोजी कान चित्रपट महोत्सवात होणार आहे.

सिद्धार्थ हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिद्धार्थच्या "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थचा ये रे ये रे पैसा 3 हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिद्धार्थ जाधव
Cannes Film Festival: कान महोत्सवामध्ये पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा कोणता ? 'या' चित्रपटांचा वाजलाय डंका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.