Movies In Cannes Film Festival: सध्या सर्वत्र कान चित्रपट महोत्सवाची (Cannes Film Festival) चर्चा होत आहे. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 16 मे रोजी कान चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. यावेळी कान चित्रपट महोत्सवामध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होत आहेत. जगातील प्रतिष्ठित पुरस्कारापैकी एक असलेला कान चित्रपट महोत्सवामध्ये अनेक भारतीय चित्रपटांना गौरवण्यात आलं आहे. कान चित्रपट महोत्सवाच्या इतिहासाबद्दल आणि कान चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार जिंकलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
कान चित्रपट महोत्सवाची सुरुवात 1946 मध्ये झाली. त्यानंतर या महोत्सवाची लोकप्रियता वाढली. 20 सप्टेंबर 1946 रोजी पहिल्या कान चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कान चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात भारतीय चित्रपटांचा देखील समावेश आहे. कान चित्रपट महोत्सवात अनेक भारतीय चित्रपटांचा गौरव करण्यात आला. कान चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार प्राप्त केलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
1946 मध्ये रिलीज झालेल्या 'नीचा नगर' या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कान चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केलं.
बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला दो बिघा जमीन या चित्रपटाला कान 1953 मध्ये प्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1954 मध्ये बालकलाकार नाजने बूट पॉलिश या चित्रपटासाठी कान चित्रपट महोत्सवामध्ये स्पेशल डिस्टिंक्शन अवॉर्ड जिंकला.
सत्यजित रे यांच्या 'पाथेर पांचाली' या चित्रपटाने 1955 मध्ये बेस्ट ह्यूमन डॉक्यूमेंट या कॅटेगिरीतील Prestigious Palm d’Or जिंकला होता.
मृणाल सेनच्या ख़ारिज या बंगाली चित्रपटाला 1983 मध्ये कान चित्रपट महोत्सवाचा स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला होता.
‘सलाम बॉम्बे’, Marana Simhasanam,‘द लंचबॉक्स’, मसान, अ नाइट ऑफ नोइंट नथिंग, ऑल दॅट ब्रीथ्स या चित्रपटांना देखील कान चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.