Bollywood Entertainment News : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित सिनेमा सिंघम अगेन प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. सिनेमा दिवाळीत प्रदर्शनासाठी तयार आहे तर सेन्सॉर बोर्डानेही त्याला प्रमाणपत्र दिल आहे पण सिनेमाचं प्रदर्शन करण्यापूर्वी अनेक बदल करण्याच्या सूचनाही सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत.
या सिनेमाला U/A प्रमाणपत्र देण्यात आले असून या सिनेमातील काही सीन्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सिंघम अगेन सिनेमाचं कथानक रामायणाशी जोडण्यात आल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून सेन्सॉर बोर्डाने कठोर पावले उचलत तब्बल 7.12 मिनिटांचं फुटेज काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.