Chandu Champion: 'चंदू चॅम्पियन' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणाले, "कार्तिकचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स"

Chandu Champion Audience Review: काही नेटकऱ्यांनी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.
'चंदू चॅम्पियन' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणाले, "कार्तिकचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स"
Chandu Championsakal
Updated on

Chandu Champion Twitter Review: अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट आज (14 जून) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांनी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे. अशातच काही नेटकऱ्यांनी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.अनेकांनी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

एका नेटकऱ्यांनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं कौतुक केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "कार्तिक आर्यन पडद्यावर चॅम्पियन होऊन आला आहे. त्याचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमधून जाताना आयुष्यात काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते"

दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "हा कार्तिक आर्यनचा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. चंदू चॅम्पियन तुम्हाला हसवतो, रडवतो आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिवतो, कबीर खानचा हा एक विलक्षण चित्रपट आहे."

'चंदू चॅम्पियन' हा भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कार्तिकने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरची बरीच चर्चा झाली. तसेच कार्तिकने अनेक मुलाखतीत त्यानं या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं.

'चंदू चॅम्पियन' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणाले, "कार्तिकचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स"
Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.