Bigg Boss Marathi Day 1 Update : नव्या सीझनमध्ये पहिल्याच दिवशी सदस्यांना होतोय त्रास, ब्रेकफास्ट समोर असताना रहावं लागणार उपाशी ?

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये कलाकार उपाशी राहावं लागणार आहे. काय आहे कारण जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : बिग बॉस मराठीचं नवं सीझन वेगळं असणार असं सुरुवातीपासून बोललं गेलं होतं. नव्या सीझनचा नवा होस्ट देखील प्रेक्षकांसमोर आला. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचं होस्टिंग करतोय. नुकताच या सीझनचा ग्रँड प्रीमियर पार पडला. तब्बल १६ महारथी स्पर्धक आता बिग बॉस मराठीच्या घरात गेले आहेत. मात्र पहिल्याच दिवसी यंदाच्या सीझनचं वेगळेपण पाहायला मिळतय.

नवा टास्क

बिग बॉस मराठीच्या घरातील पहिलाच दिवस सदस्यांसाठी अनेक आव्हांनं समोर घेऊन आलाय. या सदस्यांचा शंभर दिवसांचा प्रवास सुरु झालाय मात्र पहिल्याच दिवशी सदस्यांना विविध गोष्टींना सामोरं जावं लागतय. अगदी पहिल्याच दिवशी पाणी नसण्यापासून ते आता स्पर्धकांना उपाशी रहावं लागतय की काय असं चित्र पाहायला मिळतय. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

भन्नाट प्रोमो

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस स्पर्धकांशी संवाद साधतात. ज्यात गार्डनर एरियामध्ये स्पर्धकांसाठी लॅव्हिश ब्रेकफास्ट आणला जातो. हा ब्रेकफास्ट आणला असला तरी तो स्पर्धकांना मिळेल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ब्रेकफास्ट बघून स्पर्धक आनंदी झाले खरे पण यातही खास ट्विस्ट असणार आहे. त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एन्ट्री होते. काहीही न बोलता त्यांच्याकडे असलेला एक पेपर हे अनोळखे व्यक्ती घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर याला हात लावू नका असं लिहिलेलं असतं. त्यामुळे हा ब्रेकफास्ट मिळवण्यासाठी पहिल्याच दिवशी सदस्यांना टास्क दिला जाणार की काय असा प्रश्न पडलाय. पहिल्याच दिवशी बिग बॉसने खेळाला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतय.

बिग बॉसच्या ग्रँड घरात फक्त आराम नाही तर पाणी, अन्न यासाठी देखील किंमत मोजावी लागणार असल्याचं पाहायला मिळतय. पहिल्याच दिवसाची सकाळ ही ब्रेकफास्ट न करताच होईल की बिग बॉसने पाठवलेला हा खास ब्रेकफास्ट सगळ्या सदस्यांना मिळेल ? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

आता पहिल्याच दिवशी सदस्य ब्रेकफास्ट पासून वंचित राहतील किंवा त्यांना उपाशी रहावं लागणार का ? हा खास ब्रेकफास्ट आता कुणाच्या नशिबात असेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यंदाच्या भागात पाहायला मिळतील. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर आणि जीओ सिनेमावर कधीही.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात वाद, मेकअप वरुन स्पर्धक वैतागले तर बिग बॉसदेखील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.