Criminal Justice 4: माधव मिश्रा पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला; 'क्रिमिनल जस्टिस'च्या नव्या सीझनची घोषणा

Pankaj Tripathi Web Series: नुकताच डिस्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन क्रिमिनल जस्टिस-4 या वेब सीरिजचा टीझर शेअर करण्यात आला आहे.
'क्रिमिनल जस्टिस'च्या नव्या सीझनची घोषणा
Criminal Justice 4sakal
Updated on

Criminal Justice 4: ओटीटीवर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज रिलीज होत असतात. अशातच आता 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजच्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा केल्यानंतर चाहते खुश झाले आहेत. क्रिमिनल जस्टिस-4 (Criminal Justice 4) ची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच डिस्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन क्रिमिनल जस्टिस-4 या वेब सीरिजचा टीझर शेअर करण्यात आला आहे.

क्रिमिनल जस्टिस-4 चा टीझर

डिस्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या क्रिमिनल जस्टिस-4 या वेब सीरिजच्या टीझरमध्ये कोर्टातील एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये वकील माधव मिश्रा हे म्हणतात, "शांतता राखा कोर्ट चालू आहे, आम्ही लवकरच येत आहोत. तिथे आरामात आम्हाला बघा". या टीझरला कॅप्शन देण्यात आलं, "कोर्ट जारी है, और नये सीज़न की तैयारी भी, आ रहे हैं माधव मिश्रा, क्रिमिनल जस्टिस के नए सीज़न के साथ!"

क्रिमिनल जस्टिस या वेब सीरिजमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी हे वकील माधव मिश्रा यांची भूमिका साकारतात. या वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये एक नवं प्रकरण दाखवण्यात आलं आहे. या प्रकरणांची कोर्टातील सुनावणी तसेच आरोपीच्या मनात सुरु असणारे विचार हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येते. अशातच आता क्रिमिनल जस्टिस या वेब सीरिजच्या नव्या सीझनमध्ये कोणते प्रकरण दाखवण्यात येणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

'क्रिमिनल जस्टिस'च्या नव्या सीझनची घोषणा
Cannes Film Festival: कान महोत्सवामध्ये पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा कोणता ? 'या' चित्रपटांचा वाजलाय डंका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.