चांदण्यात न्या ग हिला... भावी आई-बाबांचं भन्नाट फोटोशूट, दीपिका-रणवीरमुळे नेटकरी मात्र झाले कन्फ्युज

Deepika Padukone Shoot: दीपिका पदुकोणने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर तिला तिची बेबी बंप बनवल्याबद्दल तिची टीका आणि आरोपांचा सामना करावा लागला. आता तिने तिच्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. तिने रणवीर सोबत भन्नाट फोटोशूट केले आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneESakal
Updated on

Deepika and Ranveer Pregnancy Photoshoot: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडप्याने फेब्रुवारीत प्रेग्नन्सी जाहीर केली होती. सप्टेंबरमध्ये दोघेही आपल्या बाळाचे स्वागत करतील. प्रसूतीच्या काही दिवस आधी दीपिका पदुकोणने तिचे पहिले मॅटर्निटी फोटोशूट केले. यावेळी पती रणवीर सिंगही एकत्र दिसत आहे. मात्र यावर तिचे चाहते संभ्रमात पडले आहेत. फोटोशूट आहे की काही गोड बातमी दिली, अशा विचारात चाहते आहेत.

बॉलीवूड तारे आणि सेलिब्रिटी जोडपे, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी प्रेग्नेंसी शूट केले आहे. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. काळ्या-पांढऱ्या फोटोंमध्ये हे जोडपे सुंदर दिसत होते. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा अतिशय सुंदर अवतार पाहायला मिळाला. तसेच ही छायाचित्रे शेअर करताना दीपिका पदुकोणने कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही तर एक लक्षवेधी इमोजी आणि हृदयस्पर्शी बनवले. फोटोनंतर चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.