Deepika Padukone: यंदाच्या 'मेट गाला 2024' ला दीपिका राहणार गैरहजर, 'हे' आहे कारण

Deepika Padukone: दीपिका यंदाच्या 'मेट गाला 2024' या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीये. यामागील कारण जाणून घेऊयात...
यंदाच्या 'मेट गाला 2024' ला दीपिका राहणार गैरहजर
Deepika Padukoneesakal
Updated on

Deepika Padukone: 'मॉम टू बी' दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या सतत चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ती लावत असलेली हजेरी यावर तिचे चाहते बारीक नजर ठेवून असून सतत तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यास उत्सुक असतात. आपल्या युनिक फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणाऱ्या दीपिकाच्या चाहत्यांसाठी मात्र एक निराशाजनक बातमी आहे. दीपिका यंदाच्या 'मेट गाला 2024' या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीये. गेल्या काही वर्षांपासून दीपिका या कार्यक्रमाला सातत्याने हजेरी लावली आहे. पण यंदा तिच्या पूर्वनियोजित कामांमुळे ती यावेळी मेट गालाला उपस्थित राहू शकणार नसल्याचं म्हंटलं जातंय.

'हे' आहे कारण:

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दीपिकाने आधीच तिच्या तारखा सिनेमाच्या शूटसाठी दिल्या आहेत आणि ती या काळात तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असणार आहे. सूत्रांनी इंडिया डॉट कॉम या वेबसाईटला दिलेली मुलाखतीत सांगितलं कि,"दीपिका सातत्याने मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत आलीये. त्यामुळे यावर्षीही तिचे चाहते तिला रेड कार्पेटवर पाहण्यास उत्सुक असणं स्वाभाविक आहे. ती जागतिक स्तराची ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका सध्या सिंघम ३ या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे आणि हा सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तिचा कल्की २८९८ एडी हा सिनेमा या मे महिन्यात रिलीज होतो आहे. त्यामुळे तिचं सगळं वेळापत्रक मेट गालाच्या तारखांशी जुळत नाहीये. त्यामुळे ती या वर्षीच्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही ." असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

तसेच दीपिका प्रेग्नेंट असून सप्टेंबरमध्ये तिच्या बाळाचा जन्म होणार असल्याचं म्हंटलं जातंय. त्यामुळे सध्या ती जास्तीत जास्त वेळ तिचे आगामी प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात देत आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी शेअर करताच तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

यंदाच्या 'मेट गाला 2024' ला दीपिका राहणार गैरहजर
Deepika Padukone: दीपिकाचा ऑस्करकडून सन्मान ! रणवीरने केलं बायकोचं कौतुक

मेट गाला म्हणजे नेमकं काय?

'मेट गाला' हा कार्यक्रम हा न्यूयॉर्कमधील कॉस्च्युम इन्स्टिटयूटतर्फे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. हा कार्यक्रम मेट बॉल या नावानेही प्रसिद्ध आहे. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स या संस्थेच्या निधी उभारणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमातून मिळालेले सगळे पैसे या संस्थेला दान करण्यात येतात. सुरवातीला फक्त निधी उभारणीसाठी होणारा हा कार्यक्रम आता फॅशन जगतातील एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला आहे. वेगवेगळ्या थिमवरील सेलिब्रिटीजचे हटके पोशाख यामुळे या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झालंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.