Delhi Police: 'शाब्बास! सचिवजी, तुम्ही खूप चांगलं काम केलंत...' दिल्ली पोलिसांनी पंचायतीचा व्हिडीओ शेअर करत नागरीकांना दिला सल्ला

Delhi Police: दिल्ली पोलिसांनी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका दृश्याचा व्हिडिओ शेअर केला असून लोकांना दारू पिऊन कधीही गाडी चालवू नका असा सल्ला दिला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर, त्याचे कॅप्शन लिहिले आहे, 'शाब्बास! सचिव जी... तुम्ही छान काम केले.
Delhi Police
Delhi PoliceEsakal
Updated on

प्राइम व्हिडिओवरील वेब सीरीज पंचायत सध्या लोकांच्या पसंतीस उतरतावा दिसत आहे. प्रत्येक सीझन लोकांना आवडतो आहे. त्याचा तिसरा सीझन २८ मे रोजी रिलीज झाला आहे. त्यानंतर सर्वजण या मालिकेवर चर्चा करत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनीही एक सीन शेअर करून लोकांना सल्ला दिला आहे.

मालिकेतील एका दृश्याचा व्हिडिओ शेअर करून पोलिसांनी लोकांना दारू पिऊन गाडी चालवू नका असा सल्ला दिला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर, त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'शाब्बास! सचिव जी... तुम्ही छान काम केले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये सचिवांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

Delhi Police
Hari Namacha Danka: वाजणार हरिनामाचा डंका! सयाजी शिंदेंचा चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सचिवांची भूमिका साकारणारा अभिषेक दोन लोकांना विचारतात की, आपत्कालीन परिस्थिती आहे, आपल्याला फकौली मार्केटमध्ये जायचं आहे, यावर एक व्यक्ती म्हणतो की तो गाडी चालवेल पण तो थोडा नशेत आहे.

यानंतर प्रल्हाद चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणतो की, मी गाडी चालवतो, मला गाडीची चावी द्या, मग सचिव विचारतात, तुम्ही किती दारू प्यायली आहे. दोघांनी दारू प्यायल्याचे सांगितले. यानंतर शेवटी सचिवाच गाडी चालवतात.

Delhi Police
Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

व्हिडीओच्या शेवटी त्यावर मजकूर लिहिला आहे, 'कोणतीही परिस्थिती असो... दारू पिऊन गाडी चालवू नका किंवा गाडी चालवू देऊ नका.' लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'बिनोद पाहा जरा जनजागृती कशी केली जात आहे.' दुसरा सोशल मिडीया युजर म्हणतो, 'नो ड्रिंक नो ड्राईव्ह मोहीम कशी राबवली जात हे पाहिलं का बिनोद' तिसरा यूजर म्हणतो, 'यामध्ये कौतुक करण्यासारखे काय आहे? तो ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत होता आणि त्याला चालू किंवा बंद कसे करावे हे देखील माहित नव्हते. म्हणजे, जर एखादी व्यक्ती नशेत नसेल तर तो डीएलशिवाय गाडी चालवू शकतो. आणखी एक युजर म्हणतो, 'सचिवांकडे परवाना नाही. चलन किती लागेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.