Kiran Gaikwad : 'फेरीवाला ते डीजे' ; 'देवमाणूस' साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला त्याचा स्ट्रगल ,"...आणि अडीच लाख रुपयाचा डीजे सेट उडाला"

Kiran Gaikwad shared his struggle : अभिनेता किरण गायकवाडने शिक्षण पूर्ण करण्यासाठी पेरू विकले. जाणून घेऊया त्याच्या या स्ट्रगलविषयी.
Kiran Gaikwad remembers his struggling days
Kiran Gaikwad remembers his struggling daysEsakal
Updated on

Kiran Gaikwad Interview : देवमाणूस या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या किरण गायकवाडने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केलाय. नुकतंच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने केलेला स्ट्रगल सांगितला.

राजश्री मराठीच्या त्याची गोष्ट या कार्यक्रमात किरणने हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याचा स्ट्रगल शेअर केला. तो म्हणाला,"लहान असताना आमची परिस्थिती खूप वाईट होती. आम्ही झोपडपट्टीत राहायचो. लहान असताना मी शिक्षण पूर्ण करण्यासाठी पेरू विकायचो. त्यातून काही फायदा व्हायचा नाही. पण मी हे काम केलं आहे. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आलो. तेव्हा एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉयचं काम केला आहे. आतापर्यंत मी कोणताही काम केलं नाही असं नाही. मी सगळ्या प्रकारची काम केली आहेत. वाढप्याचं काम केलं आहे, रिपेअरिंगचं काम केलं आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरचं काम केलंय. पहिल्यापासून कमी तिथे आम्ही ही कामाची पद्धत असल्याने तीच सवय लागली होती. "

तो डीजे म्हणून काम कसा करू लागला याविषयी सांगताना तो म्हणाला,"मला पहिल्यापासूनच संगीताचं आकर्षण आहे. रस्त्याने जाताना मी गणपतीत वाजणारी किंवा वरातीत वाजणारी गाणी ऐकायचो त्याच मला आकर्षण होतं. त्यानंतर एका दादांकडे तो सेट होता. त्यावेळी त्याला साउंड ऑपरेटर म्हणायचे. त्या डीजे म्हणतात हेही मला माहित नव्हतं. मी त्यांच्याबरोबर जायला लागतो. त्यातला जो मुलगा ते मशीन ऑपरेट करायचा एक दिवस तो आला नाही. मग त्या दिवशी ते काम मी केलं. मी वाजवलेली गाणी त्या दादांना आवडली आणि त्यांनी मला ते काम कायमस्वरुपी दिलं. त्यानंतर मी डीजे म्हणून काम केलं. मी अडीच लाखांचा सेटही विकत घेतला. पण एक दिवस तो सेट शॉर्ट सर्किटमुळे उडाला. माझं ते काम बंद झालं. मी हार मानली नाही. मला लगेच दुसरं काम मिळालं. "

Kiran Gaikwad remembers his struggling days
Video : थलाईवा बिग बींच्या पाया पडायला जाताच अमिताभ यांनी केली 'ही' कृती ; व्हिडिओची होतेय चर्चा

किरणने एकांकिका, नाटकांमध्ये काम करत असतानाच त्याला लागीर झालं जी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली. यातील त्याचं काम गाजलं. त्यानंतर किरणची देवमाणूस ही मालिका गाजली. या मालिकेत त्याने साकारलेली खुनी डॉक्टरची भूमिका सगळ्यांनाच पसंत पडली. किरणने अनेक सिनेमांमध्येही काम केलं असून त्याचा डंका हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय.

Kiran Gaikwad remembers his struggling days
Actor Kiran Gaikwad : पिंपळनेरचा किरण आता नव्या चित्रपटात ‘दंग’; ‘नाद-द हार्ड लव्ह’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()