Dharmaveer 2 : 'धर्मवीर - २' सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

Dharmaveer 2 Release Date Update : प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या धर्मवीर २ सिनेमाबाबत सिनेनिर्मात्यानी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Dharmaveer 2
Dharmaveer 2Esakal
Updated on

Prasad Oak : बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लाँच थाटात पार पडला. सिनेमाच्या ट्रेलर, टीझर आणि गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं असून मंगेश देसाई यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणार असून क्षितिश दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःसुद्धा यात छोटीशी भूमिका साकारली आहे.

ट्रेलर:

सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितलं कि," गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले."

Dharmaveer 2
Dharmaveer 2: 'धर्मवीर २'मध्ये हा अभिनेता साकारतोय श्रीकांत शिंदेंची भूमिका; बिग बॉस मराठीमध्येही केलाय राडा

आता हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही काळ वाट पाहावी लागेल. लवकरच सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात येईल. धर्मवीर आनंद दिघे यांचं काम आणि त्यांनी केलेलं समाजकार्य याची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Dharmaveer 2
Dharmaveer 2: 'हिंदुत्वाची गोष्ट' सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला अस्सल पठाण... लोकप्रिय अभिनेत्याचा सणसणीत टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com