New Marathi Movie: ‘एक-दोन-तीन-चार’चा ट्रेलर रिलीज; चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

The Marathi entertainment industry is currently experimenting with new things: गेल्या काही दिवसांपासून ‘एक दोन तीन चार’च्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
ek don teen char marathi movie
ek don teen char marathi moviesakal
Updated on

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यात धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार’ हा असाच आगळेवेगळे कथानक असलेला चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एक दोन तीन चार’च्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

ट्रेलरमध्ये सम्या-सायली या कपलच्या आयुष्यात आनंदाची बातमी येते. सायलीच्या प्रेग्नेंसीमुळे दोघांच्या लव्हस्टोरीला एक वेगळंच वळण येतं. पुढे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना समजतं की त्यांना एक, दोन नाही तर एकाच वेळी चक्क चार मुलं होणार आहेत. त्यामुळे दोघांनाही आनंद होतो की धक्का बसतो ते कळत नाही. पुढे दोघांच्याही कुटुंबांना आनंद होतो आणि वेगवेगळ्या कल्पना रंगतात. अशातच या कहाणीत आणखी एक ट्विस्ट येतो.

तो ट्विस्ट कोणता हे तुम्हाला ट्रेलर पाहून कळेलच. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये अमेय वाघच्या भूमिकेची छोटीशी झलक दिसते. ‘एक दोन तीन चार’मध्ये दमदार कलाकारांची टीम पहायला मिळत आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर हे कलाकार यात झळकणार आहेत. याशिवाय चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पहायला मिळणार आहे.

महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ‘फोकस इंडियन’ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुन्सर करण सोनावणे या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे. वरुण नार्वेकर दिग्दर्शित या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी लिहिले आहेत.

ek don teen char marathi movie
Divyanka Tripathi: भुरट्या चोराच्या हातसफाईने युरोप दौऱ्यात दिव्यांका-विवेक झाले कंगाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.