Dharmaveer 2: धर्मवीर - २ मध्ये एकनाथ शिंदेंचा अ‍ॅक्टिंग परफॉर्मन्स पाहिलात का? प्रेक्षकांसाठी पर्वणीच

Dharmaveer 2 Eknath Shinde Acting: शिंदेंची एंट्री चित्रपटात वेगळीच किक देऊन जात आहे.
Eknath Shinde In Dharmaveer 2
Eknath Shinde In Dharmaveer 2sakal
Updated on

Eknath Shinde In Dharmaveer 2 : ज्या चित्रपटाची चर्चा संपुर्ण राज्यात होत होती तो बहुप्रतिक्षीत धर्मवीर २ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यातच धर्मवीर २ ची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ही कथा आनंद दिघे यांची आहे. आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभरात आहे.

मात्र या चित्रपटामध्ये प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. ते म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटांमध्ये ॲक्टिंग केली आहे. आणि त्यांच्या अभिनय कौशल्याचे सर्व वर्गातून चांगलेच कौतुक केले जात आहे. (Kshitish Date as Eknath Shinde in Dharmaveer 2)

Eknath Shinde In Dharmaveer 2
Dharmaveer 2 Movie Review: ''हू इज एकनाथ शिंदे'' सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट !

धर्मवीरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये अभिनेता क्षितिज दाते यांनी अतिउच्च दर्जाचा अभिनय केला आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दाते यानेच वटवली असून दाते हे एकनाथ शिंदेच वाटत आहेत. असं जरी असल तरी शिंदेंची एंट्री चित्रपटाला वेगळीच किक देऊन जात आहे.

चित्रपटाच्या महत्त्वाच्या प्रसंगी एकनाथ शिंदे स्वतः स्वतःच्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या एंट्री वेळी संपूर्ण थेटरमध्ये टाळ्यांचा आणि शिट्टयांचा कडकडाट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde In Dharmaveer 2
Dharmaveer 2 : "ही जखम म्हणजे दिघे साहेबांनी दिलेली खास आठवण" ; प्रसाद ओकने केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.