Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील रांगडा गडी पडला परदेसी गर्लच्या प्रेमात , घरातील सदस्यांची चिडवाचिडवी सुरु

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील रांगडा गडी पडला परदेसी गर्लच्या प्रेमात , घरातील सदस्यांची चिडवाचिडवी सुरु

Bigg Boss Marathi Season 5 Day 9 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात नवीन लव्हस्टोरी सुरु झालीय. कोण आहे ही जोडी जाणून घेऊया.
Published on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. घरात निकी तांबोळी आणि अरबाज पटेल ही नवी जोडी पहिल्या आठवड्यातच जमली. त्यांचं बॉण्डिंग चर्चेत असतानाच त्यात आता घरात आणखी एक लव्हस्टोरी सुरु झालीये. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील रांगडा गडी पडला परदेसी गर्लच्या प्रेमात , घरातील सदस्यांची चिडवाचिडवी सुरु
Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडलं का? वाचा जनतेचा कौल, आधी नावं ठेवली, आता...

नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमधील इरिना आणि वैभव चव्हाणच्या बॉण्डिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. वीकेंडला पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यानंतर इरिना आणि वैभवमधील बॉण्डिंग वाढल्याचं पाहायला मिळालं. नवीन प्रोमोमधील त्यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील रांगडा गडी पडला परदेसी गर्लच्या प्रेमात , घरातील सदस्यांची चिडवाचिडवी सुरु
Shivani Sonar : शॉर्ट फिल्मने बना दी जोडी ; शिवानी-अंबरची भन्नाट लव्हस्टोरी

इरिना आणि वैभवची वाढती मैत्री, वैभव या घरातील तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे याची इरिनाने दिलेली कबुली किंवा जान्हवीने वैभवला इरिनाच्या नावाने चिडवणं तिलाफॉरेनची पाटलीन म्हणणं किंवा निक्कीचं त्यांना 'तुमचं काय चालूये' असं विचारणं या सगळ्या गोष्टींनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलय. तर घरातील सदस्यांनी त्यांना चिडवायलाही सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर हा प्रोमो गाजत असून प्रेक्षकांना मात्र ही जोडी तितकीशी आवडली आहे. अनेकांना इरिनाने वैभवबरोबर राहू नये असं वाटतंय तर काहींनी मात्र या जोडीला सपोर्ट केला आहे. इरिना आणि वैभवचं बॉण्डिंग वाढणार कि आणखी काय घडणार हे आगामी एपिसोड मध्ये समजेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील रांगडा गडी पडला परदेसी गर्लच्या प्रेमात , घरातील सदस्यांची चिडवाचिडवी सुरु
Bigg Boss Marathi Update: निक्की अन् अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण, छोट्या पुढारीची मध्यस्थी, नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.