Bhaurao Karhade : 'फकिरा' रसिकांच्या भेटीला येतोय, पण कधी?, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनीच दिली माहिती

फकिरा ही १९५९ साली प्रकाशित झालेली अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी आहे. फकिरा या मातंग समाजातील तरुणाच्या आयुष्यावर बेतलेल्या या कादंबरीने त्या काळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजही अनेकजण ही कादंबरी आवर्जून वाचतात. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या फकिराच्या गोष्टीने सगळ्यांनाच आपलंस केलं होतं आणि आता ही गोष्ट प्रेक्षकांना रुपेरी पडदयावर पाहायला मिळणार आहे.
Bhaurao Karhade
Bhaurao Karhadeesakal
Updated on

मुंबईः बबन, ख्वाडा या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. भाऊराव कऱ्हाडे आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या फकिरा या कादंबरीवर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कऱ्हाडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.

फकिरा ही १९५९ साली प्रकाशित झालेली अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी आहे. फकिरा या मातंग समाजातील तरुणाच्या आयुष्यावर बेतलेल्या या कादंबरीने त्या काळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजही अनेकजण ही कादंबरी आवर्जून वाचतात. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या फकिराच्या गोष्टीने सगळ्यांनाच आपलंस केलं होतं आणि आता ही गोष्ट प्रेक्षकांना रुपेरी पडदयावर पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात कोणते कलाकार असणार, सिनेमाचं चित्रीकरण कधी सुरु होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देणं ही भाऊरावांची खासियत आहे त्यामुळे या सिनेमात कोणते नवीन कलाकार पाहायला मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

Bhaurao Karhade
Shashank Ketkar And Mrunal Dusanis: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश

सोमवारी भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं की, मराठी साहित्यामध्ये मानाचं पान असलेला आणि महाराष्ट्राच्या मातीला भुरळ घालणारा विषय म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा "फकिरा"... आपल्या आशीर्वादाने घेऊन येतोय... हर हर महादेव.

अशी पोस्ट त्यांनी केली आणि २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होईल, असं पोस्टरवर नमूद केलं आहे.

भाऊराव यांनी आधी ख्वाडा, बबन, हैदराबाद कस्टडी आणि टीडीएम या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ख्वाडा या सिनेमासाठी त्यांना परीक्षकांतर्फे देण्यात येणारा विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. या सिनेमात भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, प्रशांत इंगळे आणि अनिल नगरकर यांची मुख्य भूमिका होती.

Bhaurao Karhade
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

ख्वाडा या सिनेमातील ‘गाणं वाजू द्या’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. २०१५ साली हा सिनेमा रिलीज झाला होता. तसेच याला राज्यशासनाचे सर्वोत्कृष्ट ग्रामीण सिनेमा, सर्वोत्कृष्ट निर्मिती, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. तर बबन या सिनेमाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती पण त्यांचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला टीडीएम सिनेमा तितकासा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे भाऊरावांच्या आगामी सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.