फॅशन डिझायनिंग हा मनोरंजन विश्वाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आता या कुशल क्षेत्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ते दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते, असे सांगण्यात येत आहे. नुकतीच प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेंडाटा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे रोहित बल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.