Father's Day 2024: यंदा फादर्स-डे खास पद्धतीनं करा साजरा; वडिलांसोबत घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट

Father's Day 2024: तुम्हाला तुमच्या वडिलांबरोबर खास पद्धतीनं फादर्स-डे साजरा करायचा असेल तर तुम्ही हे चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
यंदा फादर्स-डे खास पद्धतीनं करा साजरा; वडिलांसोबत घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट
Father's Day 2024sakal
Updated on

Father's Day 2024: आज (15 जून) फादर्स-डेनिमित्त (Father's Day 2024) अनेक जण आपल्या वडिलांना खास गिफ्ट्स देत आहेत. तसेच फादर्स-डेनिमित्त अनेकजण सोशल मीडियावर देखील खास पोस्ट शेअर करत आहेत. जर तुम्हाला तुमच्या वडिलांबरोबर खास पद्धतीनं फादर्स-डे साजरा करायचा असेल तर तुम्ही हे चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

  • चित्रपट-पीकू (Piku)

  • प्लॅटफॉर्म- प्राइम व्हिडीओ

पीकू हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करतो. वय झालेल्या वडिलांना सांभाळणाऱ्या मुलीची उडणारी तारांबळ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी बाप-लेकीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खान देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट तुम्ही यंदा फादर्स-डेला आपल्या वडिलांसोबत घरबसल्या पाहू शकता.

यंदा फादर्स-डे खास पद्धतीनं करा साजरा; वडिलांसोबत घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट
Father's Day 2024sakal
  • अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium)

  • ओटीटी प्लॅटफॉर्म- हॉटस्टार

शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या मुलीसाठी धडपडणाऱ्या वडिलांची गोष्ट अंग्रेजी मीडियम या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात इरफान खान, राधिका मदान, दीपक डोबरियाल आणि करीना कपूर खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

यंदा फादर्स-डे खास पद्धतीनं करा साजरा; वडिलांसोबत घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट
Father's Day 2024sakal
  • दंगल (Dangal)

  • ओटीटी प्लॅटफॉर्म- हॉटस्टार

2016 मध्ये रिलीज झालेला दंगल हा चित्रपट महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. महावीरसिंह फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण कसं दिलं? आपल्या मुलींसाठी त्यांनी घेतलेले कष्ट या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

यंदा फादर्स-डे खास पद्धतीनं करा साजरा; वडिलांसोबत घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट
Father’s Day 2024 : वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा वाढवायचाय? मग, फादर्स डे निमित्त बनवा ‘हे’ खास पदार्थ

चित्रपट- पा (Paa)

पा हा 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ऑरो ही भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री विद्या बालननं ऑरोच्या आईची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यानं या चित्रपटात ऑरोच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. Google TV वरुन हा चित्रपट तुम्ही रेंटवर घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.