Sonakshi & Zaheer Wedding : करिअर असो वा प्रेम सलमानच ठरला सूत्रधार ; अशी आहे झहीर-सोनाक्षीची लव्हस्टोरी

Sonakshi & Zaheer interesting lovestory : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इकबाल आज म्हणजे २३ जूनला लग्नबंधनात अडकत आहेत. जाणून घेऊया त्यांची खास लव्हस्टोरी.
Sonakshi & Zaheer Wedding
Sonakshi & Zaheer WeddingEsakal
Updated on

Sonakshi & Zaheer : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इकबालच्या (Zaheer Iqbal) लग्नाची. बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेली ही जोडी आज म्हणजे २३ जून २०२४ ला लग्नबंधनात अडकणार आहेत. जाणून घेऊया या जोडीची लव्हस्टोरी.

सोनाक्षी आणि झहीरच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये अभिनेता सलमान खानचा महत्त्वपूर्ण वाटा राहिलाय. सलमाननेच या दोन्ही कलाकारांना त्याच्या सिनेमातून लाँच केलं आहे. सोनाक्षीने दबंग तर झहीरने नोटबुक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर सोनाक्षीच्या करिअरमध्येही सलमानचा हस्तक्षेप बऱ्याचदा दिसून आल्याची चर्चा आहे. पण फक्त करिअरचं नाही सोनाक्षी आणि झहीरच्या पर्सनल लाईफचा सूत्रधारही सलमान ठरलाय असं म्हणायला हरकत नाही.

दोन वर्षांपूर्वी सलमानच्या एका पार्टीमध्ये सोनाक्षी आणि झहीर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांची ओळख वाढली आणि मैत्री झाली. ही मैत्री पुढे डेटिंगमध्ये बदलली आणि काही काळाने ते दोघेही रिलेशनशिपमधे आले. पण त्यांनी त्यांचं नातं लपवून ठेवलं होतं. या दोघांनी 'डबल एक्सएल' या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यावेळेच्या प्रोमोशनच्या मुलाखतीतील त्यांचं बॉण्डिंग पाहून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण यावर त्यांनी कायमच मौन बाळगणं पसंत केलं.

पण पहिल्यांदा ते रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट मिळाली ते झहीरने सोनाक्षीच्या वाढदिवसाला केलेल्या पोस्टवरून. त्याने पोस्टमध्ये लिहिलेलं कि,"हॅपी बर्थडे सोन्झ...मला न मारल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो! अशाच अनेक डिनर, फ्लाइटस, प्रेम आणि हशा होत राहोत. ता.क - हा व्हिडिओ आम्ही एकमेकांना जेव्हापासून ओळखतो तेव्हापासूनचा आठवणी आहे."

तर सोनाक्षीनेही वेळोवेळी झहीरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळेही या चर्चांना हवा मिळाली पण तरीही त्यांनी अधिकृतरीत्या त्यांच्या रिलेशनशिपविषयी भाष्य केलं नव्हतं. पण काही महिन्यांपूर्वी एका डिनर डेटवेळी पापाराझींनी त्या दोघांना एकत्र स्पॉट केलं आणि पुन्हा एकदा रिलेशनशिपविषयीच्या चर्चांना ऊत आला.

Sonakshi & Zaheer Wedding
Sonakshi Sinha Wedding: निकाह की सातफेरे? कसं पार पडणार सोनाक्षी अन् झहीरचं लग्न? अभिनेत्रीचे होणारे सासरे म्हणाले...

पण सोनाक्षी-झहीरच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या त्या लोकसभा निवडणुकांच्या रिझल्टनंतर. सोनाक्षीने वडिलांच्या प्रचारावर आणि निकालावर परिणाम होऊ नये म्हणून ही बातमी दडवून ठेवली होती असंही म्हंटलं जातंय. पण अखेर निकालानंतर सोनाक्षी लग्न करणार असल्याची बातमी सगळ्यांना समजली. त्यानंतर सिन्हा परिवारात वाद असल्याचीही चर्चा होती पण आता सगळं काही आलबेल असल्याचं दिसून येत असून आज २३ जून २०२४ला ही जोडी रजिस्टर पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे.

Sonakshi & Zaheer Wedding
Sonakshi & Zaheer Wedding : "त्यांच्या मुलांनाही ट्रोल केलं जाईल"; सोनाक्षी-झहीरची साथ देताना ट्रोलर्सची स्वराने केली कानउघाडणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.