Ram Charan: राम चरणनं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; 'गेम चेंजर'मधील धमाकेदार गाणं रिलीज

Ram Charan: राम चरणच्या 'गेम चेंजर' (Game Changer) या आगामी चित्रपटातील जरगंडी (Jaragandi) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
Ram Charan
Ram Charanesakal
Updated on

Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरणचा (Ram Charan) आज (27 मार्च) वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच राम चरणनं त्याच्या वाढदिवसाला चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राम चरणच्या 'गेम चेंजर' (Game Changer) या आगामी चित्रपटातील जरगंडी (Jaragandi) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

कियारा अडवाणी आणि राम चरण यांच्या 'गेम चेंजर' या आगामी चित्रपटातील 'जरगंडी' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. बुधवारी सारेगामा तेलुगू या यूट्यूब चॅनेलवर 'जरगंडी' हे गाणं रिलीज झालं आहे.

दलेर मेहंदी आणि सुनिधी चौहान यांनी हे गाणं गायलं आहे तर या गाण्याचे गीतकार अनंता श्रीराम हे आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी प्रभू देवानं केली आहे.

कियारा आणि राम चरणचा जबरदस्त डान्स

कियारा आणि राम चरण यांचा जबरदस्त डान्स जरगंडी या गाण्यात बघायला मिळत आहे. या गाण्याच्या शूटिंगचे काही BTS देखील गाण्यात दाखवण्यात आले आहेत.

Ram Charan
Ram Charan: राम चरणवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पण का? पाहा व्हिडीओ

कियारानं जरगंडी या गाण्याची लिंक सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, "माझ्या प्रिय आरसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! हा आहे आमचा मेगा मास ब्लास्ट...". आता जरगंडी हे गाणं रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक 'गेम चेंजर' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

शंकर षणमुघम यांनी देखील गाण्याची लिंक सोशल मीडियावर शेअर करुन राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट (X) मध्ये लिहिलं, "आमच्या गेम चेंजर राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! तुझे जनसामान्यांवरचे प्रेम, नम्रता आणि साधेपणा कधीही बदलू नये तुमच्यासाठी आणि तुझ्या चाहत्यांसाठी आमच्याकडून ही वाढदिवसाची भेट"

शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' हा ॲक्शन-पॅक्ड थ्रिलर चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. 'गेम चेंजर' या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात कियारा आणि राम चरण यांना स्क्रिन शेअर करताना बघणं, ही चाहत्यांसाठी ट्रीट असणार आहे.

Ram Charan
Ram Charan Video: तब्बल ४१ दिवस अनवाणी राहिलेल्या राम चरणने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, जाणून घ्या कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.