Marathi Entertainment News : छत्रपतींच्या मराठा साम्राज्याची धुरा 17 व्या आणि 18 व्या दशकात यशस्वीपणे सांभाळली ती पेशव्यांनी. छत्रपतींचे पंतप्रधान असलेल्या पेशव्यांच्या दरबारात अनेक धुरंधर व्यक्ती होते. त्यातीलच एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री ! पेशव्यांच्या दरबारात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते आणि याच पेशवे दरबारातील एक गोष्ट प्रेक्षकांना फुलवंती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.