Entertainment News : गेल्या काही काळापासून युट्युबर गौरव तनेजा आणि त्याची पत्नी रितू राठी गेल्या काही काळापासून चर्चेत होती. या जोडीचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा बराच काळ रंगली होती. गौरवची पत्नी रितूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तिने संसारात येणाऱ्या अडचणींविषयी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण त्यातच गौरवने केलेल्या खुलास्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.