ऑस्कर हा सगळ्याच कलाकारांसाठी खूप महत्वाचा आणि मानाचा मानला जातो. यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये 'लापता लेडीज' हा चित्रपट अधिकृतरीत्या भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या शर्यतीत अनेक हिंदी, तेलगू, मल्याळम चित्रपटही होते. या यादीत काही मराठी चित्रपटांचीही नावं होती. दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'घरत गणपती' या चित्रपटाने देखील ऑस्करसाठी निवडले जाण्यासाठीच्या शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे चित्रपटाची अभिनेत्री निकिता दत्ता हिला आभाळ ठेंगणं झालं आहे.
निकिता दत्ता ही भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटात निकिताने पंजाबी तरुणी क्रिती आहुजाची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. तिच्या कारकिर्दीतील ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी ठरली. 'घरात गणपती' हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या सांस्कृतिक आणि भावनिक महत्व सांगतो. विशेषत: महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये. हा चित्रपट कोकण संस्कृतीचा आत्मा उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करतो, ज्यामध्ये निकिताने आपली भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. चित्रपटात निकिता तिच्या मराठी मित्राच्या गावी जाते. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर दिग्दर्शित या चित्रपटात भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी लाटकर, राजसी भावे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
निकिताचे मराठी चित्रपटसृष्टीतही हे यशस्वी पदार्पण आहे, ज्याने तिचा चाहतावर्ग आणखी वाढवला आहे. चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि ऑस्कर 2024 च्या शॉर्टलिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये इतरही 28 चित्रपट होते. कामाबद्दल सांगायचं तर निकिता लवकरच सिद्धार्थ आनंदच्या नेटफ्लिक्स प्रॉडक्शन 'ज्वेल थीफ' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.