Bollywood Entertainment News : सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या अक्षय कुमारचं एकेकाळी वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत होतं. त्याचे रिलेशनशिप, अफेअरच्या चर्चा बऱ्याच गाजल्या. नुकतंच अक्षयकुमारची जुनी सहकलाकार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गुड्डी मारुतीने केलेल्या खळबळजनक खुलास्याने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गुड्डीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षयच्या फ्लर्टी स्वभावाबद्दल आणि त्याच्या अनेक अफेअर्सबद्दल भाष्य केलं.