पहचान कौन? फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्या आहेत मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तुम्ही कोणाकोणाला ओळखलं?

Marathi Actresses Photos On Childrens Day: आज बालदिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो घेऊन आलो आहोत. त्यापैकी कुणीही ओळखू येत नाहीये.
marathi actresses childhood photos
marathi actresses childhood photosesakal
Updated on

आज १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारतात बालदिनानिमित्त खास कार्यक्रम साजरे केले जातात. लहानपण हे अतिशय रम्य असतं. प्रत्येकाच्या लहानपणीच्या काही कडू गोड आठवणी असतात. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही कलाकारांच्या आठवणी घेऊन आलो आहोत. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील काही कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांचे लहानपणीचे किस्सेही शेअर केले आहेत. चला पाहूया या अभिनेत्री लहानपणी कशा दिसत होत्या.

★ अंकिता लांडे -

अभिनेत्रीअंकिता लांडेने गर्ल्स, होय महाराजा आणि डिलिव्हरी बॉय या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालदिनानिमित्त तिच्या बालपणीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली,

“ हा माझ्या तिसऱ्या वाढदिवसाचा फोटो आहे. मला माझे लहानपणीचे वाढदिवस खूप आवडायचे आणि या फोटोमध्ये जी सायकल आहे ती मला माझ्या बाबांनी भेट म्हणून दिली होती. आणि मी लहान असताना मला नेहमी असं वाटायचं की प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला माझा वाढदिवस असावा. लहान होते त्यामुळे तेव्हा एवढी समज नव्हती. खूप छान वाटायचं की आई - बाब केक आणायचे आणि सगळे छान छान भेटवस्तू द्यायचे. मनू हे माझं टोपणनाव होतं. याचं कारण मला आईने सांगितलं होतं की तेव्हा राणी लक्ष्मीबाईची एक मालिका यायची त्यात त्यांचं टोपणनाव मनू असं होतं त्यावरून माझं टोपणनाव देखील मनू असं ठेवलं. बालपणीच्या आठवणी या सर्वांनाच प्रिय असतात."

ankita lande
ankita lande esakal

★ रिया नलावडे -

अभिनेत्री रिया नलावडे हिने नुकतेच मनमौजी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ती म्हणाली,

riya nalawade
riya nalawadeesakal

“या फोटोमध्ये मी माझ्या काकांसोबत घोडा-घोडा खेळताना दिसते आहे. खरं तर हे सगळ्याच लहान मुलांना आवडतं आणि या फोटोमध्ये मी खूप घाबरलेली दिसते. पण तसं काहीच नाही. उलट मला खूप मज्जा यायची. काका जेव्हा पण घरी यायचे तेव्हा मी त्यांच्याकडे नेहमी घोडा घोडा खेळण्यासाठी हट्ट करायचे. हा फोटो जेव्हा काढला तेव्हा मीच एक आमच्या कुटुंबात लहान होते. सगळे तेव्हा आमच्या घरी यायचे आणि माझ्यासोबत खेळायचे. माझे खूप लाड व्हायचे. आणि ते खूप सुंदर क्षण होते."

★ तन्वी मुंडले -

अभिनेत्री तन्वी मुंडले हिने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकले. ती सांगते,

tanvi mundle
tanvi mundleesakal

“ माझ्या पहिल्या वेशभूषा स्पर्धेचा हा फोटो आहे आणि मी तेव्हा अगदी ४-५ वर्षांची होते. यात मी केळीवाली बनले होती. मी पहिल्यांदाच तेव्हा मंचावर गेली होती. खूप घाबरली होती कारण इतक्या सगळ्या लोकांसमोर उभी होती. त्यामुळे ही माझ्यासाठी खूप खास आठवण आहे. यात मी घातलेली साडी , इतर आभूषणं हे सगळं मी आजही जपून ठेवलं आहे. ते रंगभूमीवरचं माझं पहिलं पाऊल म्हटलं तरी चालेल आणि आता आपण पाहतोय की किती लहान लहान मुलं चित्रपटसृष्टीत किंवा संगीत क्षेत्रात खूप छान काम करत आहेत. त्यांच्यामधला इतका आत्मविश्वास पाहून खूप छान वाटतं.

★प्रियदर्शनी इंदलकर -

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. ती म्हणाली,

priydarshini indalkar
priydarshini indalkaresakal

“शिशुवर्गातला हा माझा फोटो आहे. सीता स्वयंवरचा एक सीन आम्ही केला होता. आमच्या बाईंनी हे छोटंसं नाटक बसवलं होतं आणि यात मी सीतेची मैत्रीण होते. स्वयंवर झाल्यानंतर माझ्या हातातलं ताट आहे,त्यातली फुलं उडवायची होती आणि त्यातच मला यात काही डायलॉग नव्हता. फक्त फुलं उडवायची होती. तेव्हा मी आईकडे हट्ट केला होता की जी सीता होती तिने जे गजरे घातले होते तसेच गजरे मला सुद्धा घालायचे आहेत.आईने माझा हट्ट पूर्ण केला होता. फोटोमध्ये जे मोठे गजरे दिसतायत ते आईनेच आणले होते. लहानपणी मला साडी नेसायला खूप आवडायचं. त्यामुळे आई मला सगळ्या समारंभात साडी नेसवायची आणि छान तयार करायची. लहान असताना मी खूप कमी बोलायचे त्यामुळे मला या नाटकांत आमच्या बाईंनी काही डायलॉग दिला नव्हता. मी खूप अभ्यासू विद्यार्थिनी होते. सर्वांचं ऐकणारी, मस्ती न करणारी अशी होती आणि तीच मुलगी पुढे जाऊन अभिनेत्री होईल असं माझ्या कुठल्याच शिक्षकांना वाटलं नसेल."

★रीना मधुकर -

अभिनेत्री रीना मधुकर हिने अनेक मालिका, हिंदी चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. ती म्हणाली,

reena madhukar
reena madhukaresakal

“असे म्हटले जाते की आयुष्याचा पाया लहानपणीच भक्कम केला जातो. बालपण हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. माझ्या आई-वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला लहानपणापासूनच आयुष्यासाठी खूप छान पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे. आम्ही मुली आहोत म्हणून त्यांनी आम्हाला कसलीही बंधने घातली नाहीत. स्विमिंग असो, सायकलिंग असो किंवा मोठं झाल्यावर मोटारसायकलचं ड्रायव्हिंग असो, त्यांनी सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वावलंबी व्हावे. माझे बाबा फिटनेसमध्ये असल्यामुळे ती सवय मला आजही आहे आणि आयुष्यभर राहील. जे काही आपण लहानपणी शिकतो ते आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडते. मला असे वाटते की प्रत्येक पालकाने मुलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे.

marathi actresses childhood photos
'टाइम प्लीज' चित्रपटात होती 'सुख म्हणजे...' मधील गिरिजा प्रभू; प्रिया- उमेशसोबत केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.