Heeramandi: संजय लीला भन्साळींचं व्हिजन, अन् सात महिने 700 कारागिरांची मेहनत.. असा तयार झाला हिरामंडीचा भव्य सेट

Heeramandi: हिरामंडी या वेब सीरिजचा सेट कसा तयार झाला? याबाबत जाणून घेऊयात...
संजय लीला भन्साळींचं व्हिजन, अन् सात महिने 700 कारागिरांची मेहनत.. असा तयार झाला हिरामंडीचा भव्य सेट
Heeramandiesakal
Updated on

Heeramandi: बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आणखी एक मास्टरपीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या हिरामंडी (Heeramandi) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि या चित्रपटातील काही गाणी रिलीज करण्यात आली आहे. यांमधील भव्य-दिव्य सेट्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडी या चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी बरीच मेहतनत घेतली आहे. हिरामंडी या वेब सीरिजचा सेट कसा तयार झाला? याबाबत जाणून घेऊयात...

सेटचे फोटो व्हायरल

नुकतीच एक पोस्ट Architectural Digest India या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये हिरामंडी या वेब सीरिजच्या सेटवरील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत आणि या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये हिरामंडी या वेब सीरिजचा सेट कसा तयार झाला? याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सात महिने अन् 700 कारागिरांची मेहनत

सोशल मीडियाव शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं, "संजय लीला भन्साळी यांचे यापूर्वीचे देवदास (2002), बाजीराव मस्तानी (2015) आणि पद्मावत (2018) हे चित्रपट भव्य होते, पण हिरामंडी ही त्यांची वेब सीरिज अधिक भव्य-दिव्य आहे. या वेब सीरिजचा सेट अप्रतिम आहे, जो केवळ स्केलमध्येच नाही तर कला आणि स्थापत्य कलेवरही इतर चित्रपटांना मात करतो. सलग सात महिने, 700 कारागिरांनी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये सुमारे 60,000 लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सवर सेट उभारण्यासाठी काम केले आहे."

सेटवरील खास वस्तू

"सेटच्या भिंतींवरील तपशीलवार मुघल लघुचित्रे, नाजूक भित्तिचित्रे, ब्रिटिश अधिकाऱ्यांची वसाहती चित्रे, खिडकीच्या चौकटींवर फिलीग्रीचे काम, फरशीवर मुलामा चढवलेले कोरीव काम, बारीक नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे आणि झुंबरे हे सर्व भन्साळींच्या देखरेखीखाली हाताने बनवलेले आहेत. 1930 आणि 40 च्या दशकातील सागवान लाकडाचे फर्निचर अमदवाद येथील प्राचीन वस्तूंच्या दुकानातून आणले गेले होते, जे 15 एकरांमध्ये पसरलेले असल्यामुळे ते एक संग्रहालयासारखे आहे. तसेच, वेब सीरिजमध्ये वापरलेले काही सोफे आणि टेबल्स स्वतः भन्साळींनी त्यांच्या कलेक्शनसाठी खरेदी केल्याचे, सांगण्यात आले आहे.", असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.