पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. मात्र बुधवारी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरलं आणि भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगले. अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक जण घडलेला प्रकार दुर्देवी असल्याचे म्हणत आहेत. यादरम्यान मथुरा येथील भाजपच्या खासदार आणि बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत यामधून धडा घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, १०० ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनलमधून डिस्क्वालीफाय झाली. यामधून दिसून येते की आपले वजन नियंत्रणात ठेवणे किती आवश्यक आहे. हे खूप विचीत्र वाटतंय की १०० ग्रॅम वजनामुळे ती डिस्क्वालिफाय झाली.
त्या म्हणाल्या की, वजनामुळे विनेश फोगाट डिस्क्वालिफाय झाल्याच्या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे की आपल्यासाठी योग्य वजन असणे किती महत्वपूर्ण आहे. विशेषतः आम्ही कलाकार आणि महिलांना जागरूक राहण्याची गरज आहे की, १०० ग्रॅम वजन देखील किती मॅटर करते. पुढे बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून डिसक्वालिफाय झाल्याचे आम्हाला दुखः आहे. माझे वाटते की, तीने आपले १०० ग्रॅम वजन ताबडतोब कमी करावे. पण आता तिला संधी मिळणार नाही.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला ५० किलोग्रॅम वजनीगटात कुस्तीमधू बाद करण्यात आले आहे. यामगचे कारण विनेशचे वाढलेले वजन ठरले आहे. विनेश आज गोल्ड मेडलसाठी फायनल सामना खेळणार होती, मात्र आता ती बाहेर पडली आहे. विनेशचे वजन अवघे १०० ग्रॅम जास्त होते.
विनेश ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताच्या अनेक आजी-माजी खेळाडू, राजकीय नेते, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. देशभारातून हजोरो लोक विनेशबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.