Entertainment News : अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आहे. हिनाला स्तनांचा कर्करोग झाला असून ती देत असलेली झुंज सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. हिना धैर्याने कॅन्सरला लढा देत असली तरीही तिच्या या प्रवासात अनेक चाहते आणि कलाकारही सामील झाले आहेत जे तिला वेळोवेळी आधार देत आहेत. नुकतंच अभिनेता सलमान खाननेही तिची भेट घेतली.