समुद्रात सर्फिंगला अन् जीव गमावला; शार्कनं केलेल्या हल्ल्यात अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू
Tamayo Perrysakal

Actor: समुद्रात सर्फिंग करण्यासाठी गेला अन् जीव गमावला; शार्कनं केलेल्या हल्ल्यात अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू

Tamayo Perry: तामायोवर शार्कनं हल्ला केला. या हल्ल्यात तामायोला त्याचा जीव गमवावा लागला.
Published on

Tamayo Perry: जॉनी डेपच्या (Johnny Depp) 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' (Pirates of the Caribbean) या चित्रपटात काम करणारा हॉलिवूड अभिनेता तामायो पेरीचा (Tamayo Perry) मृत्यू झाला आहे. तामायो पेरीनं वयाच्या 49 वर्षी अखेरचा श्वास घेतला. तामायोवर शार्कनं हल्ला केला. या हल्ल्यात तामायोला त्याचा जीव गमवावा लागला. तामायोच्या निधनानं हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

शार्कने तामायोवर केला हल्ला

होनोलुलु इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने तामायो पेरीच्या मृत्यूची माहिती दिली. स्काय न्यूजनुसार, हवाईच्या ओआहूजवळील गोट आयलंडजवळ शार्कने तामायोवर हल्ला केला. एका व्यक्तीने रक्तानं माखलेल्या तमयोला पाहिले आणि त्या व्यक्तीनं तातडीने आपत्कालीन सेवांना तमयोबद्दल माहिती दिली. आपत्कालीन सेवांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तमयोला जेट स्कीवरुन समुद्रकिनारी आणले, मात्र तोपर्यंत तमयोचा मृत्यू झाला होता.

तमायोने लाइफगार्ड ड्युटीमधून काही काळ ब्रेक घेतला होता आणि सर्फिंगला गेला होता, असेही सांगण्यात येत आहे. तामायो पेरीच्या शरीरावर अनेक शार्कच्या बाइटच्या खुणा होत्या. तामायो च्या मृत्यूनंतर, सागरी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या भागात शार्क असल्याचा इशारा लोकांना दिला.

स्काई न्यूजच्या रिपोर्टनुसार, उत्तरी तटावर लाइफगार्ड म्हणून काम करणाऱ्या पेरीने जुलै 2016 मध्ये महासागर सुरक्षा विभागात काम करण्यास सुरुवात केली.

 समुद्रात सर्फिंगला अन् जीव गमावला; शार्कनं केलेल्या हल्ल्यात अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू
'ठरलं तर मग'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचं निधन; जुई गडकरी, मनवा नाईक यांच्या भावुक पोस्ट, वाढदिवशीच झाला अपघात

तामायोनं 'या' चित्रपटात केलं काम

तामायो पेरीनं ब्लू क्रश,पायरेट्स ऑफ द कॅरिबियन, चार्ली एंजेल्स या चित्रपटात काम केलं आहे. अभिनेता असण्यासोबतच, तामायो हा हवाईमध्ये लाइफगार्ड आणि सर्फिंग ट्रेनर देखील होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.