Gharoghari Matichya Chuli : थाटात पार पडणार जानकी ऋषिकेशचं लग्न ; हळदीमधील रोमँटिक डान्स करताना सुमित-रेश्माची उडाली तारांबळ

Gharoghari Matichya Chuli New Twist : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी आणि ऋषिकेशचं पुन्हा लग्न होतंय. मालिकेतील या नव्या ट्विस्टविषयी जाणून घेऊया.
Gharoghari Matichya Chuli
Gharoghari Matichya ChuliEsakal
Updated on

Star Pravah : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची अतिशय लाडकी आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. मालिकेत जानकी आणि ऋषिकेशचं पुन्हा लग्न पार पडणार असून सध्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांचा थाट या मालिकेत पाहायला मिळत आहेत.

Gharoghari Matichya Chuli
Vicky Kaushal : "मला विकीची एक्स..." ; विकीची एक्स या ओळखीवर हरलीनने सोडलं मौन, म्हणाली...

जानकी-ऋषिकेशचं संगीत

जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय. मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती संगीत सोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंब जानकी-ऋषिकेशच्या रंगात रंगून गेलं आहे.

रणदिवे कुटुंबासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, साधी माणसं मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनी देखिल खास हजेरी लावली आहे. गुरुवारी २५ जुलैला संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

Gharoghari Matichya Chuli
Marathi New Film : मुसाफिरा सिनेमानंतर पुष्कर जोग घेऊन येतोय 'टॅबू' ; पार पडला सिनेमाचा मुहूर्त

मालिकेचा बिहाइंड द सीन्स

काही दिवसांपूर्वीच त्यांचा हळदी सभारंभ थाटात पार पडला. त्यावेळीही या दोघांचा एक रोमँटिक डान्स मालिकेत पाहायला मिळाला. त्यांच्या डान्सच्या रिहर्सलचा बिहाइंड द सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं.

मालिकेतील नवीन ट्विस्ट

जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नाबरोबरच नानांच्या पहिल्या लग्नाचं आणि ऋषिकेश सावत्र मुलगा असल्याचं सत्य सगळ्यांसमोर उलगडणार आहे. त्यामुळे मालिकेतील या आगामी ट्विस्टसाठी सगळेजण उत्सुक आहेत.

Gharoghari Matichya Chuli
Family Star Box Office Collection: मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडाच्या केमिस्ट्रीने मनं जिंकली; 'फॅमिली स्टार'ने दोन दिवसांत केली एवढी कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.