Krrish Movie : 2006 साली आलेला क्रिश हा सिनेमा आठवतोय का ? हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १२६.५५ करोड रुपयांची कमाई केली होती. सुपरह्युमनवर बेतलेला या सिनेमात हृतिकने क्रिष्णा ही भूमिका साकारली होती. या क्रिष्णाच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराच कामही सगळ्यांना आवडलं होतं. आता हा बालकलाकार काय करतो जाणून घेऊया.
क्रिश सिनेमात क्रिष्णा या पात्राची भूमिका मायकी धामिजानी या बालकलाकाराने साकारली होती. १८ वर्षानंतर आता पुन्हा एकदा मायकी चर्चेत आला आहे ते त्याच्या सोशल मीडिया रील्समुळे. मायकीने सोशल मीडियावर त्याचे रील्स शेअर केले असून त्याचा आताच लूक बघून आणि त्याने निवडलेलं करिअर बघून सगळ्यांनाच धक्का बसला.
क्रिश आणि अशा अनेक सिनेमात बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर मायकी आता वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहे. तो डोळ्यांचा डॉक्टर असून सोशल मीडियावर डोळ्यांशी संबंधित आरोग्य कसे जपावे याचं रील शेअर करत असतो. नुकतंच त्याने एक रील शेअर केलं. त्यात त्याने त्याच्याकडे येणारे पेशन्ट्स त्याला ओळखतात पण त्याला त्यांनी नेमकं कुठे पाहिलंय हे आठवत नाही. तेव्हा मायकी त्यांना क्रिश सिनेमाची आठवण करून देतो असं दाखवलं आहे. सोशल मीडियावर हे रील चर्चेत आहे.
मायकीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती आणि बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्याने अखेर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. आता तो एक नावाजलेला डॉक्टर आहे. सोशल मीडियावर तो शेअर करत असलेले रील्स चर्चेत असतात.
काही दिवसांपूर्वी क्रिश ४ ची घोषणा करण्यात आली. सध्या या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि अभिनेता हृतिक रोशन सिनेमाच्या पटकथेवर काम करत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२५ ला या सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. पुन्हा एकदा अभिनेत्री प्रियांका चोप्रा या सिनेमात दिसणार का ? सिनेमात आणखी कोण कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.