Sonali Kulkarni : "हॅलोविन साजरं करताना बघून संताप आला" ; सोनालीने व्यक्त केली तिची खंत, म्हणाली...

Sonali Kulkarni about western cultural influence : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सध्या वाढत चाललेला पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावावर भाष्य केलं.
Sonali Kulkarni
Sonali KulkarniEsakal
Updated on

Sonali Kulkarni Interview : मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या परखड मतांमुळेही चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पाश्चिमात्य संस्कृतीचा सध्याच्या मुलांवर आणि पालकांवर असलेला प्रभाव आणि तिच्या मुलीवर ती करत असलेले भारतीय संस्कार यावर भाष्य केलं.

सोनाली कुलकर्णीने नुकतीच आरपार या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने पाश्चिमात्य संस्कृतीचा आणि तेथील सणांचा आताच्या लहान मुलांवर आणि पालकांवर असलेला प्रभाव याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली,"कावेरी खूप लहान होती आणि त्यावेळी हॅलोविन फेस्टिव्हल होता. मला त्या सणाविषयी फार माहित नव्हतं. त्यामुळे मला खूप राग आला होता. पण नंतर मी त्या सणाविषयी समजून घेतलं. एके दिवशी माझ्या घराच्या दारावरची बेल खूप वेळा वाजली. सुरुवातीला मला खूप राग पण नंतर शांत होऊन जेव्हा मी दार उघडलं तेव्हा लक्षात आलं कि फक्त मुलंच नाही तर पालकही त्या वेषात नटले होते. सेल्फी काढत होते. त्यानंतर माझ्या लक्षात आलं कि हे जे काही ग्लोबलायजेशन झालं आहे त्याचा प्रभाव आहे. लोकांना आता साजरं करायला काही नाहीये म्हणून ते हे सणही साजरे करत आहेत. पण मुलांना आपल्या संस्कृतीची आणि सणांची ओळख करून देणं गरजेचं आहे. "

याविषयी सांगताना तिने तिच्या मुलीला कावेरीला सणांची ओळख करून दिली. तर एकदा ती लहान असताना तिच्या शाळेतील सगळ्या वर्गमित्रांना, शिक्षकांना त्यांच्या घरी गणपतीला बोलावलं होतं असं सांगितलं. "ती सगळी मुलं घरी आली. आम्ही त्यांच्यासमोर वेगवेगळ्या कला सादर केल्या. नंतर त्या मुलांना प्रसाद दिला. ते सगळं त्या मुलांना आवडलं. सुरुवातीला कावेरीला या सगळ्याचा संकोच वाटायचा. पण तिला आता सगळं कळतंय. घरातील सण ती साजरे करते." याबरोबरच सोनालीने मुलांना घरच्या माणसांची ओढ लावली पाहिजे, त्यांना घरी त्यावेळी राहावंसं वाटलं पाहिजे असंही आवर्जून सांगितलं.

Sonali Kulkarni
Sonali Kulkarni : 'आमच्याही क्षेत्रात मोठं राजकारण, पण आम्ही...' सोनाली बिनधास्त बोलली!

सोनालीची ही मुलाखत चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत तिच्या विचारांचं कौतुक केलं. सोनालीचे सध्या गजरा आणि शॉर्ट अँड स्वीट हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि आता ती कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Sonali Kulkarni
Sonali Kulkarni : 'डिस्टब्र न होता...', 'देऊळ' फेम सोनाली कुलकर्णीच्या पोस्टनं वेधलं लक्ष!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com